स्व. भाऊसाहेब बंदोडकरांचा सुवर्ण महोत्सवी निर्वाणदिन सर्वाना बरोबर घेऊन सरकारी पातळीवर व्हावा :माजी केंद्रीयमंत्री अँड. रमाकांत खलप

.

स्व. भाऊसाहेब बंदोडकरांचा सुवर्ण महोत्सवी निर्वाणदिन सर्वाना बरोबर घेऊन सरकारी पातळीवर व्हावा :माजी केंद्रीयमंत्री अँड. रमाकांत खलप

म्हापसा ( न. प्र.):- गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भाग्यविधाते समजले जाणारे स्वर्गवासी भाऊसाहेब बांदोडकर यांची येत्या १२ ऑगस्ट रोजी सुवर्ण महोत्सवी निर्वाणदिन आहे.तो निर्वाण दिन सरकारी पातळीवर सर्वांना बरोबर घेऊन सध्याच्या राज्य सरकारने साजरा करावा. व त्याचे अध्यक्ष स्थान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भूषवावे अशी मागणी माझी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत खलप यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना रमाकांत खलप म्हणाले की गोव्यामध्ये शैक्षणिक सामाजिक अशा अनेक योजना राबवणारे भाऊसाहेब बांदोडकर हे पहिले गोव्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी सर्व सामान्यांपर्यंत कुळमुनकार यांचा पर्यंत त्यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेतले त्याचबरोबर त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांनाही एकीकडे आणण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक आणि इतर क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या योजना राबवून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आणि अशा या महान व्यक्ती महत्त्वाच्या व्यक्तीचा येत्या १२ ऑगस्ट रोजी सुवर्ण महोत्सवी निर्वाण दिन आहे. यासाठी सरकारी पातळीवर सर्वांना बरोबर घेऊन साजरा करावा अशी मागणी त्यांनी केली.
भाऊसाहेब बांदोडकरांमुळे आज आम्ही गोव्यातच नव्हे भारतातच नव्हे तर जगाच्या सर्व देशांमध्ये आज त्यांच्यामुळे गोव्याचं नाव अजरामर झालेला आहे अशा व्यक्तींचं नाव कधीही फुसले जाणार नाही त्यामुळे त्यांचे आम्ही काम लक्षात घेऊन पुढे गेले पाहिजे आणि त्यामुळे आमच्यासाठी ती एक महान व्यक्ती असून त्यांना कधीही विसरणे मुश्कील आहे असे त्यांनी सांगितले.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे भारताबरोबर भारताच्या बाहेरही नाव घेतले जाते कारण त्यांनी गोव्यात ज्या अनेक समस्या योजना शैक्षणिक कार्य केलेले आहे ते कार्य त्यांनी आज पर्यंत आपल्या गोव्याचे भूषण म्हणून राखून ठेवल्याचे ते म्हणत आहेत. भाऊसाहेब बांदोडकर ही एक महान व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने आपली शक्ती कशी वापरावी ही दाखवून दिली ते सुशिक्षिता नसले तरीही त्यांनी आपल्या परीने त्यावेळी कोणतेही या सोयी सुविधा नसताना लोकांसाठी अनेक विकास कामे केली आणि ती काम आहे घरोघरी पोचवण्याचे कामही त्यांनी व त्यांच्या बरोबरच्याने केल्याचे खलप म्हणाले.
भाऊसाहेब बांदोडकर हे राजकारणामध्ये तज्ञ नसले तरी बाहेरच्या जगामध्ये जे काही चालते त्याप्रमाणे गोव्यात अनेक गोष्टी चालवल्या असे त्यांनी सांगितले. पर्वरी येथे कोम्युनिनाद कडून भाऊंच्या नावे जागा घेण्यात आलेली आहे त्या जागेमध्ये भाऊसाहेबांचे स्मारक उभारावे असे आपल्याला वाटते त्यावेळी एक समिती काढण्यात आली होती आणि त्या समितीमध्ये आपण अध्यक्षस्थानी होतो परंतु ती त्यानंतर तशीच राहिली आता त्याची पुनर्रचना करून त्या समितीमध्ये त्यांची कन्या नातू यांना समाविष्ट करावे भाऊ प्रेमींना एकत्र करावे तसेच आमचे पूर्वी त्या समितीमध्ये आमदार मंत्री होते त्यांनाही घ्यावे आणि ही समिती परिपक्व अशी करून तेथे स्मारक उभारावे असेही आपल्याला अजून वाटते.
भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ मुंडकार यांच्याबरोबरच कसेल त्याची जमीन कायदा निर्माण केला होता तो कायदा तसाच राहिला आणि त्याची अंमलबजावणी न झाल्याने सर्व परिस्थिती बिघडून गेली आज अनेक ठिकाणी शेत बागायती इतर जमिनी आहेत त्या लोकांना देऊन आम्ही मोकळे होत आहोत परंतु यापुढे येणाऱ्या पिढीला त्याची माहिती नसणार आणि शंभर वर्षे पूर्ण होत असताना आमचे गोवा राज्यावर काहीच राहणार नाही अशी भीतीही खलप यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना रमाकांत खलप म्हणाले की आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आणि त्या निवेदनात म्हटले आहे की भाऊसाहेब बांदोडकर यांची येणाऱ्या बारा ऑगस्ट रोजी निर्माण सुवर्ण महोत्सवी निर्माण दिन आहे तो सरकारी पातळीवर व्हावा आणि त्याचे अध्यक्ष पद तुम्ही भूषवावे अशी मागणी केली आणि ते सर्वांना बरोबर घेऊन करण्याची ही विनंती आपण केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी खलप यांना विचारले की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उभे राहण्यासाठी इच्छुक आहात का त्यावेळी खलप यांनी सांगितले की आपण इच्छुक असलो तरी ना इच्छुक मात्र नसल्याचे हसत हसत त्याने म्हणाले म्हणजे यावरून ते इच्छुक असल्याचे त्यांनी दाखवून दिले ते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उतरूही शकतील असेही समजून चुकले.
फोटो :-पत्रकार परिषदेत बोलताना अँड. रमाकांत खलप (छाया :-प्रणव फोटो )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें