गोमंतकातून राज्यसभेचा खासदार या नात्याने मी बिनविरोध निर्वाचित

.

पणजी

गोमंतकातून राज्यसभेचा खासदार या नात्याने
मी बिनविरोध निर्वाचित झालो असलो तरी
सर्वसामान्य जनतेचा सेवक म्हणून माझी जबाबदारी निभावण्यास नेहमीच माझे प्राधान्य
राहील असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांनी काढले.श्री शांतादुर्गा विद्यालय परिवार, पीर्णतर्फे विद्यालयाच्या सभागृहात मा.खासदार
श्री सदानंद शेट तानावडे यांचा भावपूर्ण सत्कार
करण्यात आला त्यावेळी बोलत असताना
तानावडे यांनी राष्ट्रीय स्तरावर खासदार पदी
कार्यरत असलो तरी पीर्ण ग्राम सेवा मंडळाचा
अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षितिजावर श्री शांतादुर्गा विद्यालय परिवाराला अग्रेसर ठेवण्यासाठी माझे कटाक्षाने लक्ष राहील याची ग्वाही दिली.यावेळी व्यासपीठावर श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजनीता सावंत
श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री उमेश नाईक हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना तानावडे यानी समाज आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण समाजासाठी काय करतो या दृष्टीने कार्यरत राहिल्यास जीवनात आपली प्रगती होते हे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य उमेश नाईक यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून माननीय खासदार श्री सदानंद शेट तानावडे यांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता परब यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विश्वास नाईक व देवानंद नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें