रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे ) गोवा राज्य तर्फे सुविधा सगुण परवार  यांचा सत्कार.

.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे ) गोवा राज्य तर्फे सुविधा सगुण परवार  यांचा सत्कार.
म्हापसा वाताहार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे ) तर्फे सुविधा सगुण परवार  यांचा सत्कार, बोर्डे , डिचोली येथे करण्यात आला. सुविधा यांनी नुकताच काटमांडू – नेपाळ येथे तिसरा माऊंट एवरेस्ट इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये गाण्यात सुवर्ण पदक जिंकले, त्यात 300 हुन जास्त स्पर्धकांचा सहभाग होता. सुविधाने फक्त गोव्याचे नांवच नाही तर देशाचे नाव वर काढले, तशेच s.c. कोम्मुनिटी मधून गोव्यातून पहिली गायिका आहे असे उदगार अध्यक्ष अमित कोरगावकर यांनी काढले. या वेळी मंचावर समाजसेविका उमा पाटील, सल्लागार महादेव ठाणेकर, जनरल सेक्रेटरी तुलसीदास परवार उपस्थित होते. उमा पाटील यांनी तिला सरकारी मदत मिळावी आणि एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार असे म्हटले. कार्याध्यक्ष दीना मुळगावकर यांनी सुविधा यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. सुविधा यांनी आपले विचार मांडताना आपण जीवनात खूप उतार चढाव पहिले पण आपण खचून गेले नाही तर आपण लढून हे ध्येय मिळवल, तर इतर महिलांनी ही लढाव आणि आपल ध्येय मिळवाव अशे उदगार त्यांनी मांडले तशेच त्यांनी सुमधुर आवाजात जिंकलेल बॉलीवूड च गाणं आणि भिम गीत सादर केल.सारिका नार्वेकर आणि महादेव ठाणेकर यांनी 10उत्तीर्ण संजना  सचिन परवार / साई प्रथमेश गुरूदास परवार यांना ट्रॉफी देऊन अभिनंदन केले. आर पी आय ( कांबळे ) गोवा राज्य पधादिकारी सलीम शेख, गौतम गायकवाड, बागेश हरिजन, परशुराम गायकवाड आणि ग्रामस्थ सगुण परवार, आनंदी परवार,ज्ञानेश्वर जाधव, शाम परवार, रविना परवार, दीपाली परवार, गौरक्षा परवार, ईशान परवार, रेश्मा परवार, पायल परवार, स्वेता परवार, सुशीला परवार, लता परवार, ज्ञानेश्वर परवार, मीनाक्षी चोदणकर मोठ्या संख्यने उपस्थित होते. तुलसीदास परवार यांनी सूत्र संचालन केले तर  प्रियशा कोलमकर  यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें