सरकारी माध्यमिक विद्यालय, आल्त-बेती पर्वरी येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.
पणजी
सरकारी माध्यमिक विद्यालय, अल्त बेती येथे गोवा समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून T4 टेस्टी अँड केटरिंग व्यवसायाचे सर्वेसर्वा श्री रजत भकरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी कौशल्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या नववी व दहावीच्या NSQF च्या विद्यार्थ्यांनी शाळेत उपहारगृह जत्रा भरवली. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे न्याहारीचे पदार्थ आणले. ह्या सर्व पदार्थांची प्रतिस्पर्ध्या घेण्यात आली व श्री रजत भकरे यांनी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रीमा मडगावकर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सुजता काकुले, शिक्षिका नूतन पेडणेकर, शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या खजिनदार सौ. राईजा शेख
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आश्लेषा उमेश कोरगावकर यांनी केले तर शिक्षिका भागीरथी रेडकर हिने आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप केला.