बँकेचे आर्थिक निकाल एका दृष्टीक्षेपात (₹ कोटीमध्ये)
निकष
जून
2022 (Q1)
जून
2023 (Q1)
वार्षिक विकास
एकूण ठेवी (₹)
43,233
47,008
8.73%
एकूण कर्ज (₹)
33,823
37,292
10.26%
एकूण व्यवसाय (₹)
77,056
84,300
9.40%
रिटेल, शेती आणि एमएसएमईज
29,749
33,574
12.86%
निव्वळ नफा (₹)
234.21
261.23
11.54%
एकूण एनपीए (%)
1.69%
1.56%
–
निव्वळ एनपीए (%)
0.93%
0.66%
–
प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ
88.08%
90.49%
–
आरओए
1.83%
1.85%
–
आरओई
17.41%
14.80%
–
ईपीएस(₹)
16.43
16.50
सीआरएआर
21.67%
26.57%
–
जून २०२३ मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत बँकेचा एकूण व्यवसाय ८४,३०० कोटी रुपयांवर गेला असून विकास दर ९.४० टक्के आहे.
बँकेच्या ठेवी आणि कर्ज श्रेणी अनुक्रमे ४७,००८ कोटी रुपये आणि ३७,२९२ कोटी रुपये आहे.
कामगिरीची महत्त्वाची वैशिष्ट्ये
नेट वर्थ वार्षिक पातळीवर ५४२७ कोटी रुपयांवरून वाढून ७१९० कोटी रुपयांवर गेला आहे.
शेयरची बुक व्हॅल्यू वार्षिक पातळीवर वाढून ३८१ रुपयांवरून २६१ रुपयांवर गेली आहे.
निव्वळ नफा वार्षिक पातळीवर वाढून २३४ कोटी रुपयांवरून २६१ कोटी रुपयांवर गेला आहे.
व्याज उत्पन्न वार्षिक पातळीवर वाढून १००२ कोटी रुपयांवरून ११५६ कोटी रुपयांवर गेले आहे.
बिगर व्याज उत्पन्न वार्षिक पातळीवर वाढून १४० कोटी रुपयांवरून १६७ कोटी रुपयांवर गेले आहे.
आरएएम सेगमेंट वार्षिक पातळीवर ८८ टक्क्यांवरून वाढून ९० टक्क्यांवर गेला आहे.
जीएनपीए वार्षिक पातळीवर १.६९ टक्क्यांवरून घसरून १.५६ टक्क्यांवर गेला आहे.
एनएनपीए वार्षिक पातळीवर घसरून ०.९३ टक्क्यांवरून ०.६६ टक्क्यांवर गेला आहे.
प्रायोरिटी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज
बँकेतर्फे शेती, एमएसएमई, शिक्षण, गृहक्षेत्र अशा प्रायोरिटी क्षेत्रांना कर्ज पुरवठ्यावर भर दिला जात असून एएनबीसीमध्ये त्याचा वाटा ४० टक्यांच्या नियामक गरजेपेक्षा जास्त म्हणजेच ७५ टक्के आहे.
प्रायोरिटी क्षेत्राला दिले जाणारे कर्ज १२ टक्के विकास दरासह वाढून २७,८०५ कोटी रुपयांवर (मागील वर्ष २४,८३९ कोटी रुपये) गेले आहे.
बँकेतर्फे शेती क्षेत्राला दिले जाणारे कर्ज १२,२३१ कोटी रुपयांवर गेले आहे. शेती क्षेत्राला देण्यात आलेल्या कर्जाचा एकूण कर्जातील वाटा ३२.८० टक्के म्हणजे १८ टक्क्यांच्या नियामक गरजेपेक्षा जास्त आहे.
एमएसएमई क्षेत्राचा कर्जपुरवठा १३,३११ कोटी रुपयांपर्यंत (१२,५८८ कोटी रुपयांवरून) वाढला आहे.
वार्षिक पातळीवर कामगिरी (आर्थिक वर्ष २४ ची पहिली तिमाही वि. आर्थिक वर्ष २३ ची पहिली तिमाही)
बँकेच्या ठएवी ४७,००८ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत (गेल्या वर्षातील याच कालावधीत ४३,२३३ कोटी रुपये)
बँकेच्या कर्जाची पातळी १०.२६ टक्के विकासदरासह ३७,२९२ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ३७४.४० कोटी रुपये ऑपरेटिंग नफा आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत ३७९.९० कोटी रुपयांवर गेला.
आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील २३४.२१ कोटी रुपये निव्वळ नफा ११.५४ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत २६१.२३ कोटी रुपयांवर गेला आहे.
मालमत्तेवरील परतावे (आरओए) १.८५ टक्के आणि इक्विटीवरील परतावे १४.८० टक्के (गेल्या वर्षात अनुक्रमे १.८३ टक्के आणि १७.४१ टक्के)
बँकेचे नेटवर्थ ७१९० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. (गेल्या वर्षातील ५४२७ कोटी) ३२.४९ टक्के व १७६३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एकूण एनपीएचे एकूण कर्जासह गुणोत्तर १.५६ टक्क्यांवर गेले असून निव्वळ एनपीए ०.६६ टक्के आहे. (गेल्या वर्षातील अनुक्रमे १.६९ टक्के आणि ०.९३ टक्के)
बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज गुणोत्तर ९०.४९ टक्क्यांवर गेले आहे (गेल्या वर्षी ८८.०८ टक्के)
नवीन उपक्रम
आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत आम्ही सहा नव्या शाखा सुरू केल्या.
उद्योन्मुख एमएसएमई बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चेन्नई, मदुराई, कोईम्बतूर आणि थोटुकुडी येथे एमएसएमई कर्ज प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे.
दागिने कर्ज प्रक्रियेत पूर्णपणे ऑटोमेशन करण्यात आल्यामुळे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे.
‘आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये उंचावलेली कामगिरी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ते शाश्वत विकास करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या तिमाहीमध्ये आमच्याकडे असलेल्या एकूण ठेवी, आरएएम आणि निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. इतर राज्यांता बँकेचा विस्तार करण्यावर टीएमबीने लक्ष केंद्रित केले असून उपलब्ध पायाभूत सुविधांबरोबर आमच्या ब्रँड नावाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. आम्ही अत्याधुनिक डिजिटल सुविधाही उभारत आहोत, ज्यांच्या मदतीने एमएसएमई क्षेत्राला सक्षम करणे शक्य होईल. गुणवत्तेचा ध्यास घेत प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असताना नाविन्यास चालना देऊन ग्राहक व भागधारकांचे भविष्य आणखी उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असे तमिलनाड मर्चंटाइल बँकेचे एमडी, सीईओ श्री. एस. कृष्णन म्हणाले.
About Tamilnad Mercantile Bank:
Tamilnad Mercantile Bank Ltd (TMB) one of the renowned Old Private Sector Banks, having its Head Quarter in Thoothukudi has a long cherished history of 100+ years of eventful existence with strong fundamentals and an enviable track record of continuous profit making in the industry.
TMB having pan India presence with 536 branches and 12 Regional Offices across 17 states and 4 Union Territories serves more than 5 million delighted customers.