म्हापसा कंझ्यूमर सोसायटी ही कमीदरात स्वच्छ माल देणारे जुने आस्थापन:शिरीष दिवकर

.

म्हापसा दि २६ (प्रतिनिधी ):-म्हापसा कंझ्यूमर (म्हापसा बझार )सोसायटी ही सर्वात जुनी असून या सोसायटीमध्ये कमी दरात चांगला व स्वच्छ माल ग्राहकांना दिला जातो. त्यामुळे ग्राहक जास्तकरून या आस्थापनाकडे येतात आणि माल नेतात. त्याचप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या गणेश चतुर्थी, दिवाळी,ख्रिसमस, नववर्ष अश्या सणानिमित्य ग्राहक दोनशे रुपये व त्यावरील सामान नेतात त्यांना मोठी बक्षिसे ठेऊन त्यांचेच पैसे त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट काम सोसायटी करीत असल्याचे प्रतिपादन श्री शांतादुर्गा धारगळ संस्थानचे सचिव शिरीष दिवकर यांनी काढले.
म्हापसा कंझ्यूमर (म्हापसा बझार )सोसायटी यांनी या वर्षीच्या गणेश चतुर्थी निमित्य ग्राहकांसाठी काढलेल्या दोनशे रुपयांच्या कुपनावर मिळत असलेल्या सोडतीचा शुभारंभ केल्यावर शिरीष दिवकर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत चेअरमन शिवानंद (बाप्पा )धावजेकर, व्हाईसचेअरमन भिकू आजगावकर, संचालक प्रकाश धुमाळ, एकनाथ म्हापसेकर, विनायक दिवकर, शामसुंदर कवठणकर, सचिव युवराज पेटकर उपस्थित होते.
प्रारंभी चेअरमन शिवानंद धावजेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण करून पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. नंतर शिरीष दिवकर यांनी कुपनाचा सुभारंभ केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक प्रकाश धुमाळ यांनी तर आभार व्हाईसचेअरमन भिकू आजगावकर यांनी मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें