अ‍ॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष २४ मधील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर – ५७९७ कोटी रुपये नफ्याची नोंद, वार्षिक पातळीवर ४१ टक्क्यांची वाढ सकारात्मक व्यावसायिक वातावरण आणि ऑपरेटिंग विभागाच्या दमदार कामगिरीमुळे नफ्यात वाढ

.

अ‍ॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष २४ मधील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर – ५७९७ कोटी रुपये नफ्याची नोंद, वार्षिक पातळीवर ४१ टक्क्यांची वाढ
सकारात्मक व्यावसायिक वातावरण आणि ऑपरेटिंग विभागाच्या दमदार कामगिरीमुळे नफ्यात वाढ

अ‍ॅक्सिस बँक या भारताच्या खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एका बँकेने आज आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. बँकेने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ४१२५ कोटी रुपयांच्या तुलनेत ५७९७ कोटी रुपये निव्वळ नफ्याची नोंद केली. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वार्षिक पातळीवर २७ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर २ टक्क्यांनी वाढून ११,९५९ कोटी रुपयांवर गेले आहे. आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत ते ९३८४ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) ४.१० टक्क्यांवर गेले असून त्यात वार्षिक पातळीवर ५० बीपीएसची वाढ झाली आहे. कासा वार्षिक पातळीवर २२ टक्क्यांनी वाढला आहे. कासा गुणोत्तर ४४ टक्क्यांपर्यंत वाढले असून वार्षिक पातळीवर त्यात १५१ बीपीएसची वाढ झाली आहे. बँकेचे ऑपरेटिंग उत्पन्न वार्षिक पातळीवर ३८ टक्क्यांनी वाढून १७,०४६ कोटी रुपयांवर गेले आहे. आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत ते १२,३१२ कोटी रुपये होते. ३० जून २०२३ रोजी बँकेने एकूण एनपीए आणि निव्वळ एनपीए पातळी अनुक्रमे १.९६ टक्के आणि ०.४१ टक्क्यांवर गेल्याचे जाहीर केले. ३० जून २०२२ रोजी ते अनुक्रमे २.७६ टक्के आणि ०.६४ टक्के होते. बँकेचे शुल्क उत्पन्न आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक पातळीवर २८ टक्क्यांनी वाढून ४४८८ कोटी रुपयांवर गेले आहे. रिटेल शुल्क वार्षिक पातळीवर ३७ टक्क्यांनी वाढले असून त्याचा बँकेच्या एकूण शुल्क उत्पन्नातील वाटा ७० टक्के आहे. नफ्यासह एकूण कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ (सीएआर) १७,७४ टक्क्यांवर गेला असून सीईटी १ गुणोत्तर १४.३८ टक्के आहे. बँकेच्या उपकंपन्यांनीही आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली. त्यांनी ३०३ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदवला असून वार्षिक पातळीवर त्यात १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३० जून २०२३ रोजी बँकेच्या नेटवर्कमध्ये ४९४५ देशांतर्गत शाखा आणि एक्सटेन्शन काउंटर्सचा समावेश असून ते २७५४ केंद्रात वसलेले आहेत. ३० जून २०२२ रोजी बँकेच्या देशांतर्गत शाखांची संख्या ४७५९ होती, तर २७०२ केंद्रांत एक्सटेन्शन काउंटर्स वसलेले होते.

अ‍ॅक्सिस बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, ‘ग्राहकांना सुलभ बँकिंग सेवा पुरवत नव्या युगाचे वैशिष्ट्यपूर्ण बँकिंग क्षेत्र तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्राहकांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांना पंख देण्यासाठी आम्ही नवनवीन उत्पादने व सेवा तयार करतो. आम्ही सातत्याने प्रगती करत असून डिजिटल सेवा व उत्पादन आणि सेवांची श्रेणी अद्यावत ठेवण्यासाठी झटत असतो. आमच्या प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी ग्राहक असेल याची काळजी घेतली जाते. भारतातील लघुउद्योगांसाठी असलेले पूरक वातावरण विकासाला चालना देत आहे आणि मुबलक संधी तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रायोरिटी व्यवसायांत शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’

About Axis Bank:
Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 4,903 domestic branches (including extension counters) and 15,953 ATMs across the country as on 31st March 2023, the network of Axis Bank spreads across 2,741 cities and towns, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund and Axis Bank Foundation.

For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें