बार्देश दि ३१ (प्रतिनिधी ):- म्हापसा पालिका मार्केटमध्ये आज सायंकाळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ,पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, पालिका बाजारपेठचेअरमन आशीर्वाद खोर्जूवेकर,नगरसेवक सुशांत हरमलकर, नगरसेविका कमल डिसोजा, डॉ. नूतन बिचोलकर,म्हापसा अग्निशामक दलाचे निरीक्षक श्रीकृष्ण पर्रीकर व अभियंते यांच्या समावेत फेरी मारून म्हापसा व्यापारी संघटनेने गेल्या दोन दिवसापूर्वी म्हापसा पालिकेमध्ये जाऊन विविध व्यापारी रस्त्यावर बसून विक्री करतात त्यांच्या मुळे आम्हाला त्रास होत असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले होते त्यानुसार आजही पाहणी करण्यात आली.
यावेळी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत,सचिव सिद्धेश्वर राऊत, सदस्य जितेश डांगी तसेच इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की म्हापसा बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसून कपडे विकणारे तसेच रस्त्याच्या बाजूला बसून माल विक्री करतात आणि त्या ठिकाणी छत्र्या लावतात आणि या छत्र्यामुळे आम्हाला आमची दुकाने दिसत नाहीत.आणि त्यामुळे ग्राहक आमच्याकडे फिरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वरील सर्व अधिकाऱ्यांनी म्हापसा पालिका बाजारपेठेत पूर्णतः फेरी मारून पाहणी केली व या पाहणी मध्ये त्यांना अनेक समस्या दिसून आल्या त्यातून त्यांनी या समस्या दूर करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकारी यांनी व्यापाऱ्यांना सांगितले त्याचबरोबर अग्निशामक दलाचे निरीक्षक श्रीकृष्ण पर्रीकर यांनी या ठिकाणी सांगितले की जे पाण्याचे सोय आहे त्या ठिकाणी व्यापारी बसतात त्यामुळे एखाद्या वेळी बाजारात आग व इतर घटना घडल्यास तेथे गाडी नेण्यास मिळत नाही व पाण्याचे पाईप तिथपर्यंत पोहोचत नसल्याने ही आग जास्त प्रमाणात सर्वत्र होते.
आम्ही काल रात्री पाहणी केली आणि या पाहणीत आम्हाला असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले की म्हापसा पालिका बाजार पेठेच्या परिसरामध्ये ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, गटारावरील लाद्या गटारात पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरलेले आहे.याकडे कर्मचाऱ्यांचे व पालिका निरीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे आणि याकडे लक्ष देऊन कचरा व्यवस्था व्यवस्थित करणे तसेच निरीक्षकांनी व इतर कामगारांनी पालिका बाजारपेठेत व्यवस्थित काम करावे यासाठी पालिकेने त्यांच्याकडे लक्ष पुरवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्त्यावर बसून फळ फळावर विक्रेते कपडे विक्रेते हे मोठ्या संख्येने या ठिकाणी असून ते छत्र्या लावतात आणि या छत्र्यांमुळे लोकांना चालले ही मुश्किल झालेले आहेत यांनी आपली जागा ही अजमनीवर होते ती वर वर करत बरीच वर करून ठेवलेले आहे आणि त्यामुळे आणि त्यावर छत्र्याला लावतात आणि याचा त्रास ग्राहकांना होतो व जे दुकानदार आहे त्यांनाही होतो त्यामुळे हे छत्र्या काढून टाकाव्या व त्यांना उंची वाढवलेली आहे ती उंची कमी करण्याची ही मागणी उपस्थित व्यापाऱ्यांनी केली.
फोटो :- म्हापसा पालिका बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी सगळ्या वाटा अडवून ग्राहकांना त्रास करून टाकलेला आहे त्याची पाहणी करताना नगराध्यक्षा पालिका मुख्याधिकारी अग्निशामक दलाचे अधिकारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व इतर (छाया :-प्रणव फोटो)
म्हापसा व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या आधारे नगराध्यक्ष, पालिका मुख्याधिकारी व इतरांनी पाहणी करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले

.
[ays_slider id=1]