पतंजली योग समिती हरमल, तर्फे आज आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस, “जडीबूटी दिवस” म्हणून साजरा केला. या

.

हरमल
पतंजली योग समिती हरमल, तर्फे आज आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस, “जडीबूटी दिवस” म्हणून साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून श्री विनायक कांदोळकर सर उपस्थित होते.
सुरुवातीला योग शिक्षीका सौ. वंदना कुडव यांनी आजच्या कार्यक्रमाची महीती दिली.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!” हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देतांना प्रमुख पाहुणे श्री विनायक कादोळकर सर म्हणाले की, आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या बागेत किमान एक तरी झाड लावावे. मग ते झाड कोणतेही असुदे, फळ, फूल, औषधी अशी कोणत्याही प्रकारची असुदे, सगळ्यांनी लावून आचार्य जींचा वाढदिवस आपण साजरा करूया. कार्यक्रमाला अनेक जणांनी झाडांची रोपे आणून त्या बद्दल त्या झाडाची माहिती दिली. त्यात, सौ. वंदना कुडव, भाविका वस्त, मिना फर्नांडिस, प्रियांका हरमलकर, सुजय म्हामल, पांडुरंग पिंगे, प्रेमानंद परब, माटिल्डा मेंडोंसा, रमेश तिळवे, तुकाराम माज्जी आणि शशिकांत कोरकणकर यांनी आणलेल्या झाडांचे औषधी गुणधर्म सांगीतले. त्यात तुळस, सदाफूली, काळी मिरी, पपई, अडूळसा, कोरफड(काटेकोर), शेगूल, अशी अनेक झाडे आणून त्यावर महीती दिली.
हा कार्यक्रम सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ सभागृह हरमल येथे आयोजित करण्यात आला होता.
शेवटी शशिकांत कोरकणकर यांनी समारोप करताना सांगीतलं की वृक्ष ही आपली जीवन दाईनी आहे. वृक्ष लावली पाहिजे, जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे. तरच आपण पर्यावरणाचा समतोल साभाळू शकू.
कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी!
लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी.!!
हा संत सावतामाळी यांच्या अभंगाच्या ओळी म्हणून आणि प्रत्येकाने निच्छय करू की किमान प्रत्येकजण एक तरी झाड आजच्या दिवशी लावेल. असा निच्छय करून कार्यक्रमाचीसांगता करण्यात आली.
आजचा योग वर्ग मिना फर्नांडिस यांनी घेतला.
गेले वर्ष भर सतत योग वर्ग या ठीकाणी चालू आहे. सकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत योग वर्ग चालू असतो. ज्यांना यायचं आहे त्यांनी सौ. वंदना कुडव हरमल, यांच्याशी संपर्क साधावा किंवा योग स्थानी उपस्थित रहावे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें