पीपल्स विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

.

पीपल्स विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
—————————————-
संजय वर्मा (आयएफएस ) यांनीही साधला ‘गुगल मीट ‘द्वारे सुसंवाद
—————————————
विजयसिंह आजगांवकर

पणजी: मुत्सद्देगिरी, विश्लेषणात्मक कौशल्य व शारीरिक धैर्य या तीन बाबी भारतीय परराष्ट्र सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्यात. प्रतिवर्षी साधारणपणे ३५ उमेदवार या क्षेत्रात भरती होतात. अलिकडच्या काळात अभियांत्रिकी शाखेकडील उमेदवार परराष्ट्र सेवेत येण्याचे प्रमाण अधिक आहे असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे भारतीय विदेश सेवा सचिव (पश्चिम) संजय वर्मा (आयएफएस) यांनी ‘गुगल मीट’ द्वारे पीपल्सच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांनी देश विदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले अनुभव देखील कथन केले.

मळा-पणजी येथील पीपल्स शैक्षणिक संस्थेने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्याकरिता ५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमप्रसंगी ते आभासी पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना बोलत होते.

संजय वर्मा (आयएफएस) यांच्याबरोबरच खाजगी इक्विटी इन्व्हेस्टर तथा कॉटन ट्री मँनेजमेंट लिमिटेडचे संस्थापक शिवनंदन दळवी तसेच गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य विली गोंइज यांनीही विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधून विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.

दळवी म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करण्यासाठी तसेच नवीन रोजगार निर्माण करण्यासीठी भांडवल गुंतवणूक महत्त्वाची कामगिरी बजावते. गुंतवणुकीच्या संकल्पनेमुळे अर्थव्यवस्था वाढीस लागते.मात्र देशात विविध ठिकाणी सुरु झालेल्या ‘स्टार्ट अप ‘ मध्ये उद्योगांनी गुंतवणुक करण्याची गरज आहे. भावनिक बुद्धिमत्ता , तार्किकता , संयमशीलता व शिस्त हे गुण यशस्वी गुंतवणुकदारापाशी असायला हवेत असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी झुनझुनवाला, दमाणी, बाफेट आदींची वानगीदाखल उदाहरणे दिली.

प्राचार्य विल्फेड गोंयज यांनी कलेतील सर्जनशीलतेचे महत्व अधोरेखित करताना शिल्पकला, तैलचित्र , इलस्ट्रेशन, रिल, कोरीव काम, ग्राफिक्स, इन्फोग्राफिक्स, फिल्म पेंटिंग , अप्लाईड आर्ट, व्हिज्यूअल आर्ट, एडिटोरियल आर्ट आदी कलाप्रकारांवर भर दिला. यावेळी त्यांनी कलाप्रकारात चमकलेल्या अमृता पाटील, कालिदास सातार्डेकर, जॉन परेरा आदींचा नामोल्लेखही केला.

प्रारंभी व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. शिक्षिका मधुश्री तिंबले यांनी सूत्रनिवेदन तर माध्यमिक विभाग प्रभारी स्वाती कंटक यानी आभारप्रदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें