. रविवार दि.६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत फुटबॉल खेळाच्या मैदानाच्या प्रश्नावरून पुन्हा ग्रामसभेत बराच गोंधळ झाला.
सुरुवातीला पंचायत सचिव धीरज गोवेकर यांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला मान्यता घेण्यात आली यावेळी सरपंच अर्जुन आरोसकरव पंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित होते.
थिवीचे सरपंच अर्जुन आरोसकर यांनी थिवीच्या फुटबॉल खेळाच्या मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. फुटबॉल खेळाच्या मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी टेंडर काढण्यात आले पण एकच निविदा आल्यामुळे टेंडर मंजूर करण्यात आले नाही. पुन्हा टेंडर मागवल्यानंतर तीन निविदा आल्या त्यामुळे टेंडर मंजूर करून कंत्राट दाराला काम देण्यात आले आहे. थिवी ग्रामसभेत फुटबॉल खेळाच्या मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रॉबर्ट यांनी ठराव मांडला या फुटबॉल मैदानावरथिवी पंचायत क्षेत्रातील फुटबॉल खेळाडूंचे भवितव्य अवलंबून आहे त्यासाठी फुटबॉल खेळाचे मैदान लवकर पूर्ण करावे असे ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच अर्जुन आरोसकर यांनी फुटबॉल खेळाच्या मैदानाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामसभेत दिले.
थिवी पंचायत क्षेत्रासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स, शव वा ही का ,व थिवी उप आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून दररोज पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करावा असा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला. त्याला ग्रामस्थांनी आवाजी मत दानाने मंजुरी दिली.
माडेल थिवी येथे रस्त्याच्या बाजूला लोक मोठ्या प्रमाणावर वाहनातून कचरा फेकत असतात त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी येत असते. या ठिकाणी कॅमेरा बसून वाहनातून कचरा फेकणाऱ्यांचे फोटो घ्यावे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामसभासद सुभाष कवठणकर आणि कचरा टाकणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतः हा रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्याना अडवूनजाब विचारल्यास त्याला मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सोलर सिस्टम वर चालणारा कॅमेरा बसवावा असा ठराव घेण्यात आला. त्यासाठी खूप खर्च येत असल्यामुळे आमदार फंडातून आर्थिक सहाय्य घ्यावे असे ग्रामस्थांनी सांगितले.
थिवी पंचायत क्षेत्रातील रस्त्यांच्या डांबरी करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे सरपंच अर्जुन आरोसकर यांनी सांगितले त्यासाठी ग्रामसभेत प्रत्येकाने आपल्या भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून माहिती द्यावी तसेच गावात एकही रस्ता डांबरीकरण केल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे सरपंच अर्जुन आरोसकर यांनी सांगितले. तसेच स्थानिक आमदार व मंत्री निळकंठ ह ळ र्र न क र यांनीथिवी मतदारसंघात जास्तीत जास्त रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले व रस्त्यासाठी सरकारकडून खास आर्थिक सहाय्य मंजूर करून घेण्यात येणार आहे. बिडीओ कार्यालयातून करिष्मा साळगावकर निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. थिवी पंचायत क्षेत्रातील विकास कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सरपंच अर्जुन आरोसकर यांनी आवाहन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले .
फोटो :थिवी ग्रामसभेत बोलताना सरपंच अर्जुन आरोसकर उपस्थित पंचायत सदस्य
रविवार दि.६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत फुटबॉल खेळाच्या मैदानाच्या प्रश्नावरून पुन्हा ग्रामसभेत बराच गोंधळ झाला.

.
[ays_slider id=1]