कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी वेळेचे नियोजन योग्य तऱ्हेने करण्याची गरज आहे, तसेच आपण जे क्षेत्र निवडणार त्या क्षेत्राची आवड असेल तरच त्यात हमखास यश मिळते असे प्रतिपादन गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी केले.

.
 कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी वेळेचे नियोजन योग्य तऱ्हेने करण्याची गरज आहे, तसेच आपण जे क्षेत्र निवडणार त्या क्षेत्राची आवड असेल तरच त्यात हमखास यश मिळते असे प्रतिपादन गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी केले.
      96 कुळी मराठा संघ, बार्देश तर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. म्हापसा येथील हॉटेल सुहास च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष प्रताप परब, सचिव धर्मा नाईक, खजिनदार उल्हास शेटगावकर उपस्थित होते.
       गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की मोबाईलच्या युगात वाचनाचे महत्त्व कमी झालेले आहे, याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी पुस्तक वाचावे अशी योजना तयार करण्यात आली होती परंतु या योजनेला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळत नाही अशी खंत शेट्ये यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी यशाची काही उदाहरणे सांगितली.
          सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला व संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुहास नाईक यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर समाजाचे अध्यक्ष प्रताप परप यांनी उपस्थितांचे स्वागत करून जीवनात यशाचे शिखर गाठवायचे असेल तर कष्ट करायला हवेत तसेच उच्च विचार बाळगायला हवेत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
        यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी व पदवी /पदव्युत्तर (व्यावसायिक) परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या महिला विभागाच्या अध्यक्ष प्रिया परब यांनी केले तर सचिव धर्म नाईक यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
     फोटो….1) 96 कुळी मराठा संघ, बार्देश आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये,  संघाचे अध्यक्ष प्रताप परब व इतर मान्यवर. 2) गुणगौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें