*Riot गेम्सकडून स्पर्धात्मक गेमर्ससाठी अल्टिमेट ट्रेनिंग ग्राऊंड ‘व्हॅलोरण्ट प्रिमिअर’ लाँच*
Goa, 2023: Riot Games बहुप्रतिक्षित नवीन स्पर्धात्मक मोड व्हॅलोरण्ट प्रिमिअर आज लाँच होण्यास सज्ज आहे.
व्हॅलोरण्ट हा Riot Games ५व्ही५ कॅरेक्टर-आधारित टॅक्टाइल शूटर गेम आहे. प्रिमिअर व्हॅलोरण्टची टीम-आाधरित स्पर्धात्मक सिस्टम आहे, जी गेम व स्पोर्टला एक टीम म्हणून कनेक्ट करते. खेळाडू आता त्यांच्या स्वत:च्या टीम्स तयार करू शकतात आणि नियुक्त केलेल्या मॅप्सवर साप्ताहित सामन्यांच्या सिरीजमध्ये स्पर्धा करू शकतात. अधिक सामने जिंकणाऱ्या टीम्सना प्लेऑफ टूर्नामेंटमध्ये स्थान मिळेल. या मोडची काही काळापासून बीटा चाचणी करण्यात आली आहे आणि आता अखेर जगभरातील सर्व खेळाडूंसाठी सादर करण्यात आला आहे.
Riot गेम्स भारत व दक्षिण आशिया बाजारपेठांशी कटिबद्ध आहे. या बाजारपेठांमध्ये निष्ठावान खेळाडू आहेत आणि ईस्पोर्ट्स स्थितीमध्ये वाढ होत आहे. प्रिमिअर मित्रांना एकत्र स्पर्धा करण्यासोबत मजबूत टीम तयार करण्यासाठी उत्साहवर्धक आनंद देईल. भविष्यात प्रिमिअर व्हीसीटी चॅलेंजर लीगसाठी मार्ग असेल, जी जागतिक स्पर्धात्मक ईस्पोर्ट्स टूर्नामेंट सिरीज आहे. Riot गेम्सने घोषणा केली होती की व्हीसीटी चॅम्पियन्स २०२३ साठी बक्षीसाची रक्कम २.२५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.