शापोरा जेटीचे बांधकाम व येथील समुद्राच्या मुखावर तयार होणाऱ्या सेंड बारच्या ड्रेझिंग चे काम एकाच वेळी सुरू करण्यात

.

शापोरा जेटीचे बांधकाम व येथील समुद्राच्या मुखावर तयार होणाऱ्या सेंड बारच्या ड्रेझिंग चे काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे, शापोरा जेटीचे बांधकाम करण्यासाठी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडे प्रस्ताव दिलेला असून ड्रेझिंग ची जबाबदारी कॅप्टन ऑफ पोर्ट्स यांना देण्यात आलेली आहे. येत्या शुक्रवारी कॅप्टन ऑफ पोर्ट चे अधिकारी पाहणी करता येणार आहेत, सर्वांच्या सूचनांचा आदर करून हे काम करण्यात येईल असे आश्वासन शिओली मतदार संघाच्या आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांनी दिले.
शापोरा बोट मालक संघटनेतर्फे तसेच येथील मासेमार बांधवा तर्फे शापोरा जेटीवरून समुद्राला नारळ अर्पण करण्याच्या कार्यक्रमा वेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत शापोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर, हणजूण कायसुव पंचायतीच्या पंच सदस्य स्मिता खुर्जुवेकर व इतर बोट मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदाच्या मोसमात येथून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांना चांगला व्यवसाय व्हावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
सुरुवातीला शापोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी सर्वांचे स्वागत करून येथील व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली.

फोटो….. शापोरा जेटीवरून समुद्राला नारळ अर्पण करण्याच्या कार्यक्रमा वेळी उपस्थित आमदार डिलायला लोबो सोबत शापोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर,पंच सदस्य स्मिता खुर्जुवेकर व इतर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें