हरमल ‘दुर्वांकुर अभंग सम्राट’चा पहिला मानकरी आनंद सावळ देसाई,उपसंचालक परब यांच्याहस्ते प्रदान
हरमल प्रतिनिधी
येथील दुर्वांकुर कला केंद्र,हरमल व कला संस्कृती संचालनालय, पणजी, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्वांकुर अभंग सम्राट 2023’ च्या चंदेरी मुकुटाचा पहिला मानकरी आनंद सावळदेसाई (पेडणे)यांना प्राप्त झाला.विजेत्यास मांद्रेचे आमदार जित आरोलकर पुरस्कृत रोख रु 15 हजार,समाजकार्यकर्ते गुरुदास नानोस्कर पुरस्कृत चांदीचा मुकुट, स्मृतीचिन्ह, शाल,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
हरमल सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात आयोजित स्पर्धेत रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेचा बक्षिस वितरण संपन्न झाला.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे कला संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब तर उपसरपंच दिव्या गडेकर, पंच रजनी इब्राह्मपुरकर, उद्योजक संतोष कोरकणकर, माजी सरपंच अनंत गडेकर,अजय कलंगुटकर,संस्थेचे अध्यक्ष चंद्रहास दाभोलकर, उपाध्यक्ष प्रकाश रामजी,उपसचिव सज्जन नाईक,खजिनदार संजय नाईक,उपखजिनदार दत्ताराम पार्सेकर उपस्थित होते.दुर्वांकुर संस्थेने अभंग सम्राट स्पर्धा घेऊन राज्यात आदर्श निर्माण केला.संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याकामी दुर्वांकुर संस्था झटत असल्याचे पाहून समाधान आहे.कला संस्कृती खाते राज्यांत अनेकविध उपक्रम राबवित असून,दुर्वांकुर संस्थेने उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था,पुरस्कारासाठी प्रयत्न करायला पाहिजे,असे उपसंचालक परब यांनी व्यक्त केले. संस्थेकडे अनुभवी सदस्यबळ असून ह्या संस्थेला निश्चित उजवल भविष्य असल्याचे सांगून, कला संस्कृती खात्याकडून भरीव सहकार्य मिळेल असे आश्वासन उपसंचालक परब यांनी दिले.उद्योजक संतोष कोरकणकर यांनी संस्थेचे कार्य उत्कृष्ट पध्दतीने चालू असून,सांस्कृतिक बरोबरच सामाजिक क्षेत्रांत कार्यरत राहण्याचे आवाहन कोरकणकर यांनी केले.दुर्वांकुर संस्था,दरवर्षी नरकासुराचा वध स्पर्धा घेऊन अफाट जनसमुदायाना आकर्षित करीत असते.अभंग सम्राट स्पर्धेचा आवाका लक्षणीय ठरला असून,खऱ्या अर्थाने दुर्वांकुर संस्थेला जनमत असून,असेच देदीप्यमान कार्य चालू ठेवावे असे आवाहन माजी सरपंच अनंत गडेकर यांनी केले. तसेच उपविजेत्या दत्ताराम च्यारी,सूरज शेटगांवकर,रामचंद्र पार्सेकर व साबा च्यारी याना रोख,स्मृतीचिन्ह देण्यात आले.
प्रारंभी उपाध्यक्ष प्रकाश रामजी,अध्यक्ष चंद्रहास दाभोलकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.संजय नाईक,अशोक हरमलकर, शशिकांत कोरकणकर यांनी देवस्थान अध्यक्ष, केंद्रप्रमुख,पत्रकार सन्मान, दानशुराचा सन्मान सोहळ्याचे सूत्रनिवेदन केले.संस्थेचे गुरुदास नानोस्कर,प्रणब परब,प्रदीप नाईक,गोविंद परब,रामचंद्र केरकर, आत्माराम कोरकणकर राधाकृष्ण नागवेकर, कृष्णा नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोहळ्याचे निवेदन सचिव अर्जुन गडेकर तर दत्ताराम ठाकूर यांनी निकाल वाचन व आभार मानले.स्पर्धेचे परीक्षण मोहनदास पोळे व नाशिकेत सातरडेकर तर राया कोरगावकर व दयानंद कां दोळकर यांनी साथसंगत तर प्रा गोविंद भगत यांनी सूत्रनिवेदन केले.
प्रारंभी उपसंचालक अशोक परब यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून रंगमंचाचे उदघाटन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन केले.तत्पूर्वी केरी श्री आजोबा क्रीडा व सांस्कृतिक संघाची दिंडी व हरमल बाल भवन केंद्राच्या मुलींनी गणेश स्तवन नृत्य सादर केले.
फोटो
हरमल—दुर्वांकुर अभंग सम्राट 2023 चा मुकुट आनंद सावळ देसाई यांना दिल्यानंतर कला संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब,दिव्या गडेकर, रजनी इब्राह्मपुरकर, संतोष कोरकणकर, अनंत गडेकर, अजय कलांगुटकर व संस्थेचे पदाधिकारी.