पिर्ण ग्रामसेवा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत

.
म्हापसा वाताहार पिर्ण ग्रामसेवा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असताना मला मिळालेला मुख्यमंत्री गुरु वशिष्ठ शिक्षक पुरस्कार
हा केवळ माझा नसून यात संस्थाचालक,
,प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर वर्ग या सर्वांचा मोठा वाटा आहे  या सर्वांच्या सक्रिय उत्तेजनामुळे आपण एवढी मोठी मजल मारू शकलो असे भावपूर्ण उद्गार  सत्कारमूर्ती प्रा.दत्ता परब यांनी काढले.श्री
शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पीर्ण व पीर्ण ग्रामसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   प्राध्यापक दत्ता परब यांचा मुख्यमंत्री गुरु वशिष्ठ शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक परब यांनी पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असून शैक्षणिक, सामाजिक , व सांस्कृतिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्यासाठी माझे यापुढे प्राधान्य राहील असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री उमेश नाईक, पीर्ण ग्रामसेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक, पालक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष श्री वसंत नाईक हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव
श्री प्रकाश नाईक यांनी प्राध्यापक दत्ता परब यांनी विद्यालयासाठी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांचा आदर्श इतर शिक्षकांनी ठेवावा असे आवाहन केले. पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत नाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक परब घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक करून येणाऱ्या काळात देखील
शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना पालक- शिक्षक संघाचा सदैव पाठिंबा राहील अशी ग्वाही दिली. यावेळी समोर असलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य उमेश नाईक यांनी प्राध्यापक परब यांच्या अध्यापनाचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन  विविध क्षेत्रात विद्यालयाचे  नाव वर काढावे  तरच खऱ्या अर्थाने
 त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे चीज होईल अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी पीर्ण  ग्रामसेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन प्राध्यापक दत्ता परब यांना गौरविण्यात आले. सत्कार मूर्तींचा परिचय प्राध्यापक रजनीकांत सावंत यांनी करून दिला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामचंद्र नाईक देसाई यांनी केले.कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी देवानंद नाईक व विश्वास नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
छाया भारत बेतकेकर ( दत्ता परब यांचा सत्कार करताना प्रकाश नाईक व उमेश नाईक

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें