होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे
SP125 स्पोर्ट्स एडिशन लाँच
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२३ – सणासुदीच्या काळासाठी सज्ज होत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज SP125 स्पोर्ट्स एडिशन लाँच केली आहे. याची किंमत रू. ९०,५६७ (एक्स दिल्ली शोरूम) ठेवण्यात आली आहे. नवी SP125 स्पोर्टस एडिशन आकर्षक रूप आणि दमदार कामगिरी यांचा मिलाफ साधणारी आहे. या गाडीची नोंदणी खुली झाली असून ती देशभरातील होंडा रेड विंग वितरकांकडे मर्यादित काळासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
होंडाची अद्ययावत मर्यादित आवृत्ती सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘सुरुवातीपासून होंडा SP125 ने आपली अत्याधुनिक वैशिष्ट्ये, स्टायलिश डिझाइन व दमदार कामगिरीने १२५ सीसी मोटरसायकलच्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की नव्याने लाँच करण्यात आलेली SP125 स्पोर्ट्स एडिशन ग्राहकांना विशेषतः तरुणांना जास्त आनंद देईल.’
होंडा SP125 स्पोर्ट्स एडिशनच्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘नवी होंडा SP125 स्पोर्ट्स एडिशन लाँच करताना आम्हाला आनंद वाटत आहे. ठळक डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ही मोटरसायकल बियांड अडव्हान्स्ड अनुभव देईल. आम्हाला खात्री आहे, की SP125 स्पोर्ट्स एडिशन ग्राहकांमध्ये लोकप्रिय होईल व या विभागात नवे मापदंड प्रस्थापित करेल.’
होंडा SP125 स्पोर्ट्स एडिशन –
नवी SP125 स्पोर्ट्स एडिशन बळकट टँक डिझाइन, मॅट मफलर कव्हर, सुधारित ग्राफिक्स, बॉडी पॅनेल्सवरील नवीन व्हायब्रंट स्ट्राइप्स व अलॉय व्हील्सने तरुणांना आकर्षित करेल. ही मोटरसायकल आकर्षक डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि हेवी ग्रे मेटॅलिक अशा रंगांत उपलब्ध करण्यात आली असून हे रंग सर्वांचे लक्ष वेधून घेतील.
SP125 स्पोर्ट्स एडिशन ची वैशिष्ट्ये इतरांपेक्षा वेगळी, सर्वोत्तम आणि पैशांचे पूर्ण मूल्य देणारी आहेत. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल गियर पोझिशन इंडिकेटर व मायलेजच्या इतर माहितीसह देण्यात आले आहे. १२३.९४ सीसी इंजिन सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ नियमानुसार पीजीएम- एफआय इंजिनमुळे SP125 जबरदस्त कामगिरी करते आणि ८केडब्ल्यू उर्जा व १०.९ एनएम टॉर्कची निर्मिती करते.
खास मूल्य –
होंडा SP125 स्पोर्ट्स एडिशनची किंमत रू. ९०,५६७ (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. एचएमएसआयतर्फे या मोटरसायकलवर १० वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी) देण्यात येणार आहे.
मॉडेल
किंमत (एक्स शोरूम दिल्ली)
SP125 स्पोर्ट्स एडिशन
रू. ९०,५६७
For more information, contact: public.relations@honda2wheelersindia.com