सम्राट क्लब म्हापसाचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न :अध्यक्ष विनोद सांगोडकर, सचिव रामा रेवणकर तर खजिनदारपदी प्रकाश धुमाळ यांची निवड

म्हापसा(वाताहार ):- आपली संस्कृती संवर्धन करण्याचे कार्य सम्राट क्लब म्हापसा गेली अनेक वर्ष करीत आहे. त्याने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सतत वावरणारा हा सम्राट क्लब म्हापसा ही संस्था नावारूपास आलेली आहे. आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांचे गौरव त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थी व महिला, पुरुषांना सहकार्य करण्याचे कार्यही केलेले आहे आणि यापुढेही ते करणार आहेत. असे प्रतिपादन सम्राट क्लबचे ज्येष्ठ माजी अध्यक्ष अँड.अवधूत सलत्री यांनी केले.
सम्राट क्लब म्हापशाच्या अधिकारग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने म्हापसा येथील रेसिडेन्सी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत खास अतिथी म्हणून ब्लॉक अध्यक्ष काजल चोडणकर, विद्यमान अध्यक्ष विनोद सांगोडकर, मावळते अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर,मावळते खजिनदार रितेश कारेकर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे रीतसर उदघाटन करण्यात आले .
पुढे बोलताना अँड. सम्राट सलत्री म्हणाले की, सम्राट क्लब म्हापसा दरवर्षी नाट्यमहोत्सव, रंगभूमी दिन,संगीत सितारा, गोमंतक रंगभूमी दिन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी करीत असते आणि त्यामुळेच या कलेच्या माध्यमातून गावातील अनेक कलाकारांना प्रेरणा मिळालेली आहे. यामुळे विविध भागांमध्ये सुप्रसिद्ध झालेले कलाकार आहे त्यांची दखल क्लब तर्फे घेतली जाते. तसेच नवनवीन युवकांना व्यासपीठ देण्याचे कार्य करत असताना त्यांच्या अंगामध्ये जे कला गुण आहेत ते लोकांपर्यंत दाखवण्याचे कामही क्लब करीत आहेत. सम्राट क्लब म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये नियम व अटी असतात व त्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही आवाहन यावेळी बोलताना अँड. अवधूत सलत्री यांनी उपस्थित क्लबच्या पदाधिकाऱ्यांना व सभासदांना केले.
तर ब्लॉक अध्यक्ष काजल चोडणकर, यांनी सम्राट क्लब म्हापसामध्ये नवीन आलेल्या रमेश कवळेकर व अयमत हुसेन या नवीन सभासदांना शपथ दिली. व चोडणकर यांनी त्यांना सांगितले की या क्लबच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे त्यांचे जे नियम आहेत.ते तंतोतंत आचरणात आण्याची गरज असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी २०२३-२०२४ सालासाठी काढण्यात आलेल्या नूतन कार्यकारणीला प्रमुख पाहुणे सम्राट अँड. अवधून सलत्री यांनी अध्यक्ष सम्राट विनोद सांगोडकर, माजी अध्यक्ष सम्राट चंद्रकांत आमोणकर, पुढील वर्षाचे अध्यक्ष सम्राट अमीन खान, सचिव सम्राट रामा रेवणकर, सहसचिव सम्राट अभय हजारे,खजिनदार सम्राट प्रकाश धुमाळ, उपाध्यक्ष सम्राट दीपक डांगी, संचालक सम्राट सत्यजित हिरवे, सम्राट रितेश कारेकर, सम्राट सागर नार्वेकर , सम्राट शाजहांन शेख, सम्राट रंजन ओहा,सम्राट गोविंदराज देसाई यांना शपथ देण्यात आली.
प्रारंभी अध्यक्ष सम्राट चंद्रकांत आमोणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अहवाल वाचन सम्राट गोविदराज देसाई यांनी केला.पाहुण्याची ओळख सम्राट योगेश हिरवे व सम्राट विनोद मळीक यांनी करून दिली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राट संदीप वालावलकर व कु. रुचा देसाई यांनी तर आभार नूतन सचिव सम्राट रामा रेवणकर यांनी केले. यावेळी मावळते अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर यांच्या हस्ते २०२२-२०२३या वर्षात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
फोटो :-सम्राट क्लब म्हापसाची२०२३ -२०२४
सालासाठी निवडण्यात आलेली नूतन कार्यकारणी मान्यवरांसमवेत.