पारंपरिक खाद्य संस्कृती जतनाच्या प्रयत्नांचे श्रीपाद नाईक यांनी केले कौतुक

.

पारंपरिक खाद्य संस्कृती जतनाच्या
प्रयत्नांचे श्रीपाद नाईक यांनी केले कौतुक

पणजी : दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर पारंपरिक खाद्यपदार्थ आणि पाककृतींकडे वळावे, असे आवाहन केंद्रीय पर्यटन, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री यांनी रविवारी प्रसिद्ध झालेल्या लेखिका डॉ. रिना साईश लवंदे यांच्या ‘सुरबूस खाणा जेवणा’ या पुस्तकाबद्दल केले.
जुन्या काळातील पारंपरिक आणि लोकप्रिय पाककृती एकत्र आणणार्‍या डॉ. रिना साईश लवंदे लिखित ‘सुरबूस खाणा जेवणा’ या कोंकणी पाककृती पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना नाईक यांनी आजवर केवळ तोंडावाटे टिकून राहिलेले वेगाने लोप पावत चाललेले ज्ञान जपल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
जुन्या काळी जेव्हा आम्ही स्वयंपाक करायचो, तेव्हा औषधी परिणाम करणारे घटक असायचे आणि ते तयार करण्यासाठी वापरले जायचे. आज आपल्या आयुष्यावर फास्ट फूडचा ताबा आहे आणि आपण वेळेवर जेवत नाही. आयुर्वेद आपल्याला काय, कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात खावे हे सांगत असे. अशा प्रकारची पुस्तके आपल्याला पुन्हा मुळाशी नेण्यास मदत करतील, याचा मला आनंद आहे, असे नाईक म्हणाले.
लेखिका डॉ. रिना लवंदे यांच्या पुस्तकाविषयी विनंती कळंगुटकर यांनी माहिती दिली. पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे रमेश घाडी, पुस्तकाचे रचनाकार हृषिकेश आठवले, पुस्तकाचे प्रकाशक ईआर. सागर लवंदे यांच्या उपस्थितीत नाईक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
एस. एल. बुक हाऊस यांनी प्रकाशित केलेेले हे पहिले पुस्तक आहे.
178 पानांच्या या पुस्तकात शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींबरोबरच चहापानासाठीच्या आणि पारंपरिक चवींच्या पदार्थांचा समावेश आहे.
साईश लवंदे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सूरज लवंदे यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें