भारतातील पहिला सिनेमा सबस्क्रिप्शन उपक्रम पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्टसह आता दर महिन्याला पहा १० चित्रपट प्रत्येकी ६९.९० रूपयांमध्ये
पणजी: भारतीयांमध्ये चित्रपटांप्रती प्रेम अविरत आहे. अनेकजण दर आठवड्याला थिएटरमध्ये नवीन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. आज, व्यक्ती होणाऱ्या अधिक खर्चांबाबत अधिक जागरूक बनले असताना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याच्या प्रमाणामध्ये काहीशी घट झाली आहे. भारतातील चित्रपटप्रेमींना अविश्वसनीय दरामध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद देण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स लि. या भारतातील सर्वात मोठ्या मल्टीप्लेक्स चेनला त्यांची नवीन ऑफरिंग पासपोर्टच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हा मासिक सबस्क्रिप्शन पास प्रदर्शित होणारा नवीन चित्रपट पाहायला न चुकण्याची इच्छा असलेल्या चित्रपटप्रेमींसाठी परिपूर्ण आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून सबस्क्रायबर्सना किफायतशीर दरामध्ये अविश्वसनीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सबस्क्रायबर्स फक्त ६९९ रूपयांमध्ये दर महिन्याला सोमवार ते गुरूवार जवळपास १० चित्रपट पाहू शकतात. याचा अर्थ असा की, प्रत्येक चित्रपट पाहण्याचा खर्च सुविधा शुल्क वगळून ६९.९० रूपये इतका कमी आहे. पीव्हीआर आयनॉक्सने फक्त २०,००० सबस्क्रिप्शन्ससह मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत पासपोर्ट लाँच केले आहे.
लाँच करण्यात आलेल्या पीव्हीआर पासपोर्टबाबत मत व्यक्त करत पीव्हीआर आयनॉक्स लि.चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्हणाले, ”सिनेमा सर्वाचे लक्ष वेधून घेतो, एक मंत्रमुग्ध अनुभव, ज्याचा फक्त मोठ्या पडद्यावर आनंद घेता येऊ शकतो. पीव्हीआरमध्ये आम्ही प्रेक्षकांच्या इच्छांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला तिकिटांच्या अधिक किमतींबाबत त्यांच्याकडून ऐकायला मिळाले आहे, ज्यामुळे सिनेमा पाहण्याच्या आनंदामध्ये अडथळा येतो. ही बाब जाणून घेत आम्ही मासिक सबस्क्रिप्शन पास – पासपोर्ट अभिमानाने सादर करत आहोत, जो सिनेमॅटिक विश्वाचा आनंद घेण्यामध्ये येणाऱ्या खर्चाबाबतच्या तुमच्या समस्यांचे निराकरण करेल आणि देशभरातील प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या पद्धतीला नवीन आकार देईल. आम्हाला खात्री आहे की, आमचे ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन शैलींमधील कन्टेन्टसाठी दर्शकत्व वाढवेल, ज्यामुळे ग्राहक अधिक खर्च न करता नवीन कन्टेन्टचा शोध घेण्यासह अधिक चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.”
गौतम पुढे म्हणाले, ”आम्हाला ‘जवान’, ‘गदर २’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘ओएमजी २’ आणि ‘ड्रिम गर्ल २’ या चित्रपटांना मिळालेल्या यशाचा अत्यंत अभिमान वाटतो. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि रूपेरी पडद्याची आकर्षकता दाखवली. आमची प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह त्यांच्यामधील रूपेरी पडद्याबाबतच्या पसंतीला पुन्हा जागरूक करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आम्ही आगामी तिमाहींमधील बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाटत पाहत आहोत. आम्हाला खात्री आहे की, अधिकाधिक चित्रपटप्रेमी आमच्या मल्टीप्लेक्सेसमध्ये येतील आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतील. आम्ही प्रेक्षकांना संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत. म्हणून आम्ही चाहत्यांना पासपोर्टचा अवलंब करत सिनेमॅटिक विश्वाचा अद्भुत अनुभव घेण्याचे आवाहन करत आहोत.”
भारतातील पहिला सिनेमा सबस्क्रिप्शन उपक्रम पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्टसह आता दर महिन्याला पहा १० चित्रपट प्रत्येकी ६९.९० रूपयांमध्ये

.
[ays_slider id=1]