उदयनिधी स्टॅलीन यांच्या विरोधात पणजी पोलीस तामिळनाडूचे मंत्री ठाण्यात तक्रार

.

उदयनिधी स्टॅलीन यांच्या विरोधात पणजी पोलीस   ठाणे तक्रार  

                          पणजी, २० ऑक्टोबर – सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ंसंबंधी, तसेच कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांका खर्गे, तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए.राजा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा प्रविष्ट करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी पणजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणार्‍या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे
उदयनिधी स्टॅलिन, प्रियांका खर्गे, खासदार ए.राजा यांच्या सोबत पत्रकार निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही ‘हेट स्पीच’ केल्याविषयी तात्काळ गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी. हा केवळ हिंदू धर्मावरील हल्ला नव्हे, तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरा यांचा अवमान आहे. याविषयी योग्य कारवाई न झाल्यास सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली जाणार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, ‘भारत माता की जय’ संघटनेचे श्री. रामदास सावईवेरेकर, पर्वरी येथील श्री रामवडेश्वर देवस्थानचे श्री. आनंद मांद्रेकर, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. सुशांत दळवी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आपले नम्र,
श्री. जयेश थळी,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें