हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोरजी येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग
पणजी, २२ ऑक्टोबर – समाजामध्ये अन्याय किंवा अत्याचार यांचा प्रतिकार करण्यासाठी आपले शरीर आणि मन सातत्याने प्रतिकारक्षम बनवणे, राष्ट्र आणि धर्म रक्षण या कार्यात सहभागी होणे या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दत्त मंदिर, बागवाडा, मोरजी, पेडणे येथे नुकताच स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली.
वर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी व्याख्यानाच्या माध्यमांतून उपस्थितांमध्ये शौर्य जागरण करणारे विचार मांडले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. भगवंत नाईक व कु. सुरभि छत्रे यांनी ‘स्वसंरक्षणाची’ प्रात्यक्षिके सादर केली. प्रसंगी ‘रडत बसण्यापेक्षा ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतल्यामुळे स्त्रिया कशा स्वयंसिद्ध होऊ शकतात’ हे या प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री दत्त मंदिर देवस्थान समितीचे सचिव श्री. सतीश च्यारी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले. या कार्यक्रमाला सुमारे शंभर जणांची उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोरजी येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग

.
[ays_slider id=1]