अॅक्सिस बँकेचा २०२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीमधील (एच-वन) करपश्चात नफा २३ टक्क्यांनी वाढून ११,६६१ कोटी रु., एच-वनमधील इक्विटीवरील एकत्रित परतावा १७९ बीपीएसने वाढून १९.०४ टक्क्यांवर, निव्वळ व्याजाचे मार्जिन ४.११ टक्के, एच-वनमध्ये शुल्कवाढीत ३० टक्के वाढ, कर्जवितरणात २३ टक्के वाढ, आरटीडीमध्ये १५ टक्के वाढ

.

अॅक्सिस बँकेचा २०२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीमधील (एच-वन) करपश्चात नफा २३ टक्क्यांनी वाढून ११,६६१ कोटी रु., एच-वनमधील इक्विटीवरील एकत्रित परतावा १७९ बीपीएसने वाढून १९.०४ टक्क्यांवर, निव्वळ व्याजाचे मार्जिन ४.११ टक्के, एच-वनमध्ये शुल्कवाढीत ३० टक्के वाढ, कर्जवितरणात २३ टक्के वाढ, आरटीडीमध्ये १५ टक्के वाढ

भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. बॅंकेला या तिमाहीत ५,८६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत बॅंकेला ५,३३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बँकेचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न (एनआयआय) गेल्या वर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी आणि गेल्या तिमाहीपेक्षा ३ टक्क्यांनी वाढून दुसऱ्या तिमाहीत १२,३१५ कोटी रुपये झाले. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत ते १०,३६० कोटी रुपये होते. निव्वळ व्याजाचे मार्जिन (एनआयएम) दुसऱ्या तिमाहीत ४.११ टक्के झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते १५ बीपीएसनी आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत १ बीपीएसने वाढले आहे. तिमाही सरासरी शिलकीच्या आधारावर, बॅंकेच्या एकूण ठेवी गेल्या वर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी आणि गेल्या तिमाहीपेक्षा १ टक्क्याने वाढल्या. तिच्या बचत खात्यातील ठेवी गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढल्या, तर चालू खात्यातील ठेवी ११ टक्क्यांनी वाढल्या. कासाचे प्रमाण वार्षिक ४३ टक्के इतके आहे. बँकेच्या कार्यान्वयीन उत्पन्नात दुसऱ्या तिमाहीत २२ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत ते १४,२१६ कोटी रुपये होते, यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत ते १७,३४९ कोटी रुपये झाले. ३० सप्टेंबर २०२३ या तारखेस, बँकेकडील ढोबळ एनपीए १.७३ टक्के आणि निव्वळ एनपीए ०.३६ टक्के होत्या. २०२४ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे बॅंकेचे शुल्क उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढून ४,९६३ कोटी रुपये झाले. यामध्ये किरकोळ शुल्क ३८ टक्क्यांनी वाढले, जे बँकेच्या एकूण शुल्क उत्पन्नाच्या ७० टक्के आहे.नफ्यासह एकूण भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीएआर) १७.८४ टक्के झाले आहे. यात सीईटी-वन रेशो १४.५६ टक्के इतका आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, “अत्यंत अस्थिर अशा जागतिक भू-राजकीय परिस्थितीतही भारताची परिस्थिती चांगली राहील, असा आम्हाला विश्वास आहे. आगामी सणासुदीच्या निमित्ताने बाजारात वस्तूंना मोठी मागणी असणार आहे आणि ही बाब उद्योग-व्यवसायासाठी चांगली आहे. अॅक्सिस बँकेत आमचा जीपीएस अजेंडा मार्गी लागला आहे आणि बँकेच्या सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये स्थिरपणे वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. प्रत्यक्षपणे होणारे व्यवहार आणि डिजिटल व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर आम्ही परिश्रमपूर्वक काम करत आहोत. केवळ महानगरे आणि शहरी भागांतच नव्हे, तर भारतातील बहुसंख्य लोकसंख्या राहात असलेल्या ग्रामीण भागातही आमच्या सेवांचा विस्तार आम्ही करीत आहोत.”

About Axis Bank:
Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 5,152 domestic branches (including extension counters) and 15,806 ATMs across the country as on 30th September, 2023. The network of Axis Bank spreads across 2,864 centres, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund and Axis Bank Foundation.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें