गिरी बार्देश येथे आपा लिपा नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसात अनेक ठिकाणी नाट्यप्रयोगासाठी मागणी

.

गिरी बार्देश येथे आपा लिपा नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसात अनेक ठिकाणी नाट्यप्रयोगासाठी मागणी
म्हापसा (न. प्र.):- कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरताना निस्वार्थ सेवा देण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. हे कलाकार पैशाच्या मागे धावत नाहीत संस्कृती संवर्धन व्हावे म्हणून अविरत मेहनत करताना. जो आनंद नाटकातून मिळतो त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आज आपली संस्कृती विकृतीकडे पोहोचत आहे अशावेळी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षणाची नितांत गरज आहे अध्यात्मिक गुरुनाते काम करीत आहेत.
नाटकाच्या द्वारेही समाज प्रबोधन आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन आपा लिपा नाटकाचे लेखक दिग्दर्शक गौरव कुबल यांनी केले. सर्वे गिरी बार्देश येथील बालमित्र सार्वजनिक नवरात्रौत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मनोमय युग मयडे प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी कोंकणी नाटक ‘ आपा लिपा ’या नाट्य प्रयोगाच्या २५ साव्या नाटकाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या नाट्य प्रयोगाला रसिकांची मागणी मोठ्याप्रमाणात होत आहे.उत्स्फूर्त होत असलेल्या नाटकाला रसिकांना खळखळून हसवीणारे हे नाटक असल्याने रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . नाट्यप्रयोगाला अजूनही गोव्यातून मागण्या येत आहेत.
आपा लिपा या नाट्यप्रयोगाचे मडगांव, केपे, रिवण, फोंडा बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी आणि पेडणे तालुक्यातील विविध कार्यक्रम सार्वजनिक गणपती,नवरात्रौत्सव, श्रीकृष्ण पूजन, अशा कार्यक्रमा वेळी मागण्या मिळत आहेत.या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक गौरव कुबल,नेपथ्य व संगीत – राया कवळेकर,कलाकार – प्रतीक्षा शिरोडकर, समर्था शिरोडकर, सन्मिता पार्सेकर, गौरव कुबल, प्रताप नागवेकर, गौतम गावस, आणि प्रणव प्रकाश धुमाळ हे कलाकार या नाटकात आपली भूमिका चोख पणे निभवताना दिसत आहे.
हे आपा लिपा नाटक कोकणी असून विनोदी असले तरी त्याला एका कुटुंबाची आणि दोन हरवलेल्या बहिणीची उत्कृष्ट अशी कथा असल्याचेही दाखविण्यात आले आहे. लेखक आणि दिग्दर्शक गौरव कुबल यांनी आपल्या सुपक डोक्यातून या नाटकाचे कथानक दाखविले. यात योग्य तर्हेने प्रकाश योजना, ध्यनी संकलन, रंगभूषा यांचा मिलाप करून यातील कलाकारांना साजेशा भूमिका दिल्या आणि त्या कशा रसिकासमोर सादर कराव्यात हे दाखवून दिले. गिरी येथे झालेल्या या नाट्यप्रयोगाला रसिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी नाटकाचे आयोजक दीपक मांद्रेकर यांचा २५ साव्या नाटकाचे अवचित्य साधून नाट्यकलाकार प्रणव प्रकाश धुमाळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी इतर कलाकार उपस्थित होते.

फोटो :-सर्वे गिरी बार्देश येथे आयोजित करण्यात आलेल्या आपा लिपा या २५ साव्या नाट्यप्रयोगावेळी यातील एक नाट्यकलाकार प्रणव धुमाळ हे नाटकाचे आयोजक दीपक मांद्रेकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करताना सोबत लेखक गौरव कुबल व इतर नाट्यकलाकार.(छाया :-प्रणव फोटो )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar