इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन

.
इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन

      भारताने रशियायुक्रेन युद्धाच्या आव्हानाला कुटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केलेत्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणाचा बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन युद्ध सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सेक्युलरिजमच्या आड हमासचे समर्थन’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.

या वेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन पुढे म्हणाले की, 7/10 ला हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करणे हे इस्रायलच्या ‘मोसाद’ या विश्वभर प्रसिद्ध असलेल्या गुप्तचर संघटनेचे मोठे अपयश आहेइस्रायलने गुप्तचर क्षेत्रात तांत्रिक बाबींवर अधिक भर दिला आणि मानवी गुप्तचर क्षेत्राकडे दुर्लक्ष केलेगाझापट्टीतून इस्रायलमध्ये प्रतिदिन कामासाठी येणार्‍या 15  ते 20 हजार नागरिकांनी ते वर्षे हमाससाठी गुप्तचर म्हणून काम केलेइस्रायलची युद्धासाठी सिद्धता नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर हमासने आक्रमण केलेइस्रायलच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ‘आयर्न डोम’ यंत्रणेला हमासच्या अल्प तंत्रज्ञानाने पराभूत केलेइस्रायलचे शहरीकरण झाल्याने तेथील नागरिकांची लढण्याची क्षमता अल्प झालेली आहेइस्रायलने त्याच्या शत्रूला कमी लेखलेशत्रूचा उद्देश समजून घेतला नाहीतर इस्रायलमधील लोक आपापसात लढत राहिलेइस्रायलच्या या सर्व चुकांमध्ये भारताने खूप काही शिकण्यासारखे आहेभारतियांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे आणि स्वासावरकर यांच्या शिकवणीनुसार कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची नागरिकांमध्ये सिद्धता निर्माण केली पाहिजे.

या वेळी सैन्यदलातील सेवानिवृत्त मेजर सरस त्रिपाठी म्हणाले की, भारताला पाकिस्तानचीन या परकीय शत्रूंबरोबरच देशाअंतर्गत कार्यरत असलेले नक्षलवादीपाकसमर्थकआतंकवादी आदी देशविरोधी शक्तींच्या विरोधात लढले पाहिजेहे जग मुत्सद्देगिरीवर (‘डिप्लोमसी’वरचालतेज्याची जशी वागणूक आहेत्यानुसारच त्याच्याशी वागावे लागतेज्यांनी भारताचे दोन तुकडे केलेत्यांना भारतात आज विशेषाधिकार देण्यात येत आहेतयासाठी देशातील काही कायदे बदलले पाहिजेतचांगले कायदे आणले पाहिजेतहिंदु धर्म मानवतावादी आहेमात्र आतंकवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाहीहमास ही एक राक्षसी संघटना आहे आणि इस्रायलने तिला संपवले पाहिजेहिंदूंच्या देवदेवतांच्या हातीही शस्त्रे आहेतयासाठी प्रत्येक हिंदूने आत्मरक्षणासाठी सरकारमान्य शस्त्र बाळगले पाहिजे.


आपला नम्र,
 
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar