स्थमाच्या गंभीर रुग्णांसाठी अॅस्ट्राझेनेकाने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू केले

.

स्थमाच्या गंभीर रुग्णांसाठी अॅस्ट्राझेनेकाने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू केले

गोवा, भारत: अॅस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लि. या विज्ञान-प्रेरित बायोफार्मास्यूटिकल कंपनीने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे अस्थमाच्या गंभीर रुग्णांसाठी समर्पित एका सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे उद्घाटन केले. हे अत्याधुनिक केंद्र दम्याच्या गंभीर रुग्णांचे उपचार आणि व्यवस्थापन यासाठीचे एक आदर्श केंद्र असून गंभीर दम्याच्या विकसित होत असलेल्या केंद्रांना मदत आणि मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हे केंद्र गंभीर अस्थमा ओळखून त्या रुग्णांचे उपचार करण्यात एक पद्धतशीर आणि मार्गदर्शक तत्वांवर आधारित दृष्टिकोन ठेवून काम करेल.
मणिपाल हॉस्पिटल, गोवाचे हॉस्पिटल डायरेक्टर आणि युनिट हेड श्री. सुरेन्द्र प्रसाद, मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि सीनियर ऑन्कोलॉजी सर्जन डॉ. शेखर साळकर आणि मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथील कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल पल्मनॉलॉजिस्ट डॉ. प्रभू प्रसाद एन. सी. यांनी पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्ज्वलित करून उद्घाटन केले.
अस्थमा हा जागतिक चिंतेचा विषय आहे. दर वर्षी 339 मिलियनपेक्षा जास्त लोक या रोगाने प्रभावित होतात, त्यापैकी 15 मिलियनपेक्षा जास्त रुग्ण फक्त भारतातले असतात. गोव्यासारख्या उष्णकटिबंधीय शहरांमध्ये, जिकडे हवा खूप दमट असते, रुग्णांना अस्थमा अटॅक वरचेवर येऊ शकतो.
गंभीर अस्थमा पीडित रुग्णांच्या व्यवस्थापनात निरंतर संशोधन, शिक्षण आणि रुग्णांचा सहकार अपेक्षित असतो. हेल्थकेअर ईकोसिस्टमशी सहज सहयोग सुनिश्चित करण्यासाठी अॅस्ट्राझेनेका संभाव्य स्थानिक भागीदारांशी चर्चा करत आहे, जेणे करून त्यांना या केंद्रांच्या संचालनात मदत मिळावी. ही कंपनी इनहेल्ड आणि बायोलॉजिक औषधांच्या बाबतीत श्वसनविषयक देखभाल करण्यात आघाडीवर आहे आणि बायो-प्रेरित उपचारांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक अस्थमा अटॅक समूळ नष्ट करून गंभीर अस्थमाच्या उपचारांत मोठा बदल घडवून आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांचा उपचारात्मक दृष्टिकोन या रोगातील रोगप्रतिकारक यंत्रणा, फुफ्फुसांची हानी आणि असामान्य पेशी दुरुस्ती प्रक्रिया आणि न्यूरोनल डिसफंक्शन याबाबतच्या शास्त्रावर फोकस करतो.
बायोलॉजिक्स चेकलिस्ट आणि डेटा-प्रेरित उपचार अभिगमासाहित अस्थमाच्या व्यवस्थापनासाठी विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या गोव्याच्या या CoE मध्ये पहिल्या 12 महिन्यांत सुमारे 7500+ रुग्णांचे स्क्रीनिंग होऊ शकेल अशी आशा आहे. या उपक्रमाची शाश्वतता सहयोग, चालू असलेले संशोधन आणि स्थानिक हेल्थकेअर व्यावसायिकांशी ज्ञानाच्या देवाणघेवाणीद्वारे सुनिश्चित करण्यात येईल.
अॅस्ट्राझेनेका इंडियाचे उपाध्यक्ष- मेडिकल अफेअर्स अँड रेग्युलेटरी, डॉ. अनिल कुकरेजा म्हणाले, “अॅस्ट्राझेनेका नावीन्यपूर्ण आणि केंद्रित उपचार पद्धतींच्या मदतीने गंभीर अस्थमासारख्या असंसर्गजन्य रोगांचा हेल्थकेअर प्रणालीवरील भार कमी करण्यास वचनबद्ध आहे. मणिपाल गोवा येथे अस्थमा प्रकरणांचे प्रमाण लक्षणीय आहे, जे विशेष देखभालीची गरज दर्शविते. या शहरातील सशक्त हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर अशा विशिष्ट सुविधांना स्थानिक हेल्थकेअर समस्यांचा सामना करण्यासाठी योग्य संधी प्रदान करते. आगामी काही वर्षांमध्ये आम्ही या केंद्रांचा विस्तार वाढवू आणि विविध प्रकारच्या रुग्णांना अतिरिक्त सेवा प्रदान करून एकंदर श्वसनविषयक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू.”
गंभीर अस्थमा CoEs चे प्राथमिक उद्देश आहेत:
देखभाल वाढवणे: ही केंद्रे आधुनिक निदान पद्धती, व्यक्ती-विशिष्ट उपचार योजना प्रदान करतील आणि क्लिनिकल ट्रायल्सपर्यंतची पोहोच वाढवतील, जेणे करून रुग्णांना श्रेष्ठ संभाव्य देखभाल मिळू शकेल.
जागरूकता वाढवणे: स्थानिक लोकांमध्ये अस्थमाविषयी आणि त्याची रोकथाम करण्याविषयी जागरूकता आणण्यासाठी त्यांना माहिती देणारे कार्यक्रम योजण्यात येतील.
संशोधन: स्थानिक संशोधन उपक्रमांच्या माध्यमातून CoEs गंभीर अस्थमाबाबतच्या संशोधनात प्रगती करेल.
मणिपाल हॉस्पिटल्स, गोवा येथील प्रमुख कन्सल्टन्ट, पल्मनॉलॉजी डॉ. प्रभू प्रसाद एन. सी. म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल येथे आमच्या आउट-पेशंट सेवेतील अस्थमा क्लिनिक अत्यंत गजबजलेले असते. येथे प्रादेशिक प्राथमिक आणि माध्यमिक आरोग्य सेवा केंद्रांमधून रुग्णांना पाठवण्यात येते. यामध्ये उपचार करण्यास कठीण असे अस्थमा रुग्ण असतात. अॅस्ट्राझेनेकाच्या सहयोगाने विशिष्ट अस्थमा क्लिनिक स्थापन करण्यात आम्ही आघाडीवर आहोत. आमच्या विविध शाखांच्या टीममध्ये डॉक्टर, श्वसन-विषयक उपचारकर्ते, परिचारिका आणि साहाय्यक आरोग्य व्यावसायिक यांचा समावेश आहे. गंभीर अस्थमासाठीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना अस्थमाविषयी आमची समज आणखी वाढविण्याच्या आणि रुग्णांवरील परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. निदान, वैद्यकीय मूल्यांकन, रुग्णास समुपदेशन आणि जीवशास्त्रीय पैलूवर लक्ष केंद्रित करणार आहोत.”
मणिपाल हॉस्पिटल्स, गोवाचे हॉस्पिटल डायरेक्टर आणि युनिट हेड श्री. सुरेन्द्र प्रसाद म्हणाले, “हेल्थकेअर उद्योगातील पुढारी या नात्याने आम्ही हे जाणतो की, लोकांची आणि समाजाची सेवा करणारी रुग्ण-केंद्रित, अचूकतेने काम करणारी हेल्थकेअर ईकोसिस्टम स्थापन करणे ही आमची जबाबदारी आहे. यांसारख्या भागीदारीद्वारे आणि उपक्रमांद्वारे धाडसी पावले उचलून आम्ही हेल्थकेअर विषयीच्या दृष्टिकोनाची पुनर्कल्पना करत आहोत आणि त्यास नवीन आकार देत आहोत आणि त्यायोगे रुग्णांसाठी अधिक चांगला अनुभ

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें