धारगळ लोकशिक्षण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिवस, रन फॉर युनिटी ,सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला , सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग तर्फे मानवंदना देण्यात आली,यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जासमिनी मांजरेकर हिने सर्व मुलांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी, तसेच राष्ट्रीय एकता दिवस निमित्त मार्गदर्शन करण्यात आले ,यावेळी मुख्याध्यापिका म्हणाल्या सरदार वल्लभभाई पटेल हे लोहा पुरुष म्हणून ओळखले जातात आणि संपूर्ण संपूर्ण देश एकत्रित करण्यासाठी त्यांचं मोठे योगदान आहे ,आजचा हा दिवस त्यांना मानवंदना देत या दिवसाची सुरुवात करून सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती भावना जागृत होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्या दिवसाचं महत्त्व जाणून घ्यावं ,अशा त्या म्हणाल्या ,यावेळी विद्यार्थी वर्ग तर्फे विद्यार्थिनी कुमारी जुही साठे हिने सर्वांना शपथ दिली आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याच्या मागोमाग शपथ घेतली ,त्यानंतर शाळेच्या परिसरातून जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी रन फॉर युनिटी साठी धावत सर्वांनी एकत्र येऊन प्रभात फेरी काढली ,यावेळी विविध घोषणा शाळेचे क्रीडा शिक्षक किशोर किनळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या ,सरदार वल्लभभाई पटेल यांचा विजय असो ,,राष्ट्रीय एकात्मता दिवसाचा विजय असो, लोहपुरुषांचा विजय असो,, अशा घोषणा देण्यात आल्या,यावेळी शाळेचे शिक्षक सिद्धेश खराडे , राजेश गावकर प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका तेजश्री देसाई शुभांगी आरोसकर ,करिष्मा , यशवंत सावंत वअनुप कांदोळकर हे उपस्थित होते.