दक्षिण गोवा युवक कॉंग्रेसची सांगेत बाईक रॅली

.

दक्षिण गोवा युवक कॉंग्रेसची सांगेत बाईक रॅली
पणजी ः काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी `शक्ती-सुपर शी` या महिला शक्तीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत, दक्षिण गोवा युवक काँग्रेसने सांगे येथील बस स्थानकापासून रविवारी बाईक रॅली आयोजित केली होती.
शक्ती-सुपर शी, हा भारतीय युवक काँग्रेसचा उपक्रम असून, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करण्याचा हेतू यामागे आहे. सांगे परिसरात फिरलेल्या या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने महिला चालकांचा समावेश होता. गोवा राज्य युवक काँग्रेसच्या प्रभारी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव रिची भार्गव यांनी पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.
शक्ती सुपर शी ही संकल्पना महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि युवक काँग्रेसमध्ये अधिकाधिक महिलांनी राजकीय सहभाग घ्यावा यासाठी आयोजित केला आहे. पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या योगदानाबद्दल स्मरण करून त्यांना वंदन करण्यासाठी दक्षिण गोवा युवक काँग्रेसने या रॅलीचे आयोजन केले आहे, असे भार्गव यांनी सांगितले.
भारतीय राजकारणात महिलांनी सक्रिय व्हावे यासाठी भारतीय युवक काँग्रेस केवळ ३३ टक्के आरक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे असे नाही, तर शक्ती सुपर शी कार्यक्रमाद्वारे हे काम हाती घेण्यात आले आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील युवक काँग्रेसची प्रभारी आणि सुपर शी कार्यक्रमाची प्रमुख तसेच राष्ट्रीय सचिव म्हणून मी स्थानिक नेत्यांचे या आयोजनाबद्दल आभार मानते, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे काँग्रेस मानते, असे दक्षिण गोवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी म्हटले.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना वंदन करण्यासाठी आम्ही त्यांच्या पुण्यतिथी दिनी बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. भारतीय युवक काँग्रेसने महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे आणि सभोवताली बदल घडवून आणण्याबाबत त्यांच्यात जागृती व्हावी, या उद्देशाने शक्ती सुपर शी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सावर्डे, कुडचडे, सांगे व केपे या भागात रॅलीने भ्रमण केले असून, या सर्व मतदारसंघांमध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने यश प्राप्त झाले आहे. आम्ही ही मोहीम गोव्यात सर्वत्र नेणार असून, अन्य मतदारसंघांतही बाईक रॅलींचे आयोजन करण्यात येईल, असे नाडर यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar