नाटक माणसाला समाजात कसे वागायचे कसे बोलायचे हे शिकण्याचे माध्यम :प्राध्यापक रवींद्र फोगेरी

.

नाटक माणसाला समाजात कसे वागायचे कसे बोलायचे हे शिकण्याचे माध्यम :प्राध्यापक रवींद्र फोगेरी
म्हापसा (न. प्र.):-नाटक हे विविध विषयाने सामावून घेतले जाते. नाटक असे माध्यम आहे की, ते माणसाला समाजात कसे वागायचे कसे बोलायचे हे शिकण्याचे माध्यम आहे.नाटक लिहिताना नाट्यलेखकाला गणितातील अधीक, वजा, गुणाकार व भागाकारासारखे जसे विषय असतात तसे त्यांना नाटकातील रंगभूमी, प्रकाश योजना, मुक्सिक असे विविध विषय हाताळावे लागतात त्याचवेळी नाटकाचा जल्म होत असल्याचे उदगार प्राध्यापक रवींद्र फोगेरी यांनी काढले.
एकतानगर हाऊसिंगबोर्ड म्हापसा येथील श्री साईनाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुदेश तांबे प्रस्तुत सिंधुकला दशावतार नाट्य मंडळ गिरगांव कुडाळ साईबाबांवर आधारित स्वामी तिन्ही जगाचा ह्या नाटकाच्या पहिल्या नाट्यप्रयोगाच्या शुभारंभावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने प्राध्यापक रवींद्र फोगेरी बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर युवा समाजसेवक हनुमंत ऊर्फ बाळू वारंग,देवस्थानचे अध्यक्ष संतोष बामणे,सचिव जयराम नाईक, सहसचिव मुलराज फडते, खजिनदार अरुण कोरगावकर, उपखजिनदार सत्यवान नाईक मुखत्यार प्रकाश धुमाळ, सदस्य शेखर गावस, लवू नाईक, समीर शिरोडकर, शंकर आंबेकर, प्रताप नाईक, मनोहर गावस व इतर पधादिकारी उपस्थित होते.
समाजसेवक बाळू वारंग यांनी आपले मनोगत वक्त करताना सांगितले की, या साईनाथ मंदिरामध्ये वर्षा काठी बरेचसे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. असे कार्यक्रम इतर मंदिरामध्ये होत असतील असे आपल्याला वाटत नसल्याचे गौरव उदगार त्यांनी काढले. या मंदिरातीप कार्यकारणीतील पदाधिकारी एकोप्याने काम करीत असताना पाहावयास मिळते हे या मंदिरातील वयस्थिष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे प्राध्यापक रवींद्र फोगेरी व बाळू वारंग यांच्या हस्ते दीपप्रज्योलीत करून या नूतन आणि पहिल्याच प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नाटकाचे सर्वेसरव्हा सुदेश तांबे यांचा फोगेरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष संतोष बामणे, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुखत्यार प्रकाश धुमाळ यांनी तर आभार सचिव जयराम नाईक यांनी मानले.
फोटो :-एकतानगर म्हापसा येथील श्री साईनाथ मंदिरातील कार्यक्रमात स्वामी तिन्ही जगाचा या नाटकाचा दीपप्रज्योलीत करून शुभारंभ करताना प्राध्यापक रवींद्र फोगेरी, सोबत बाळू वारंग व देवस्थानचे पदाधिकारी.(छाया :-प्रणव फोटो )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar