*केरी पेडणेत ३ व ४ रोजी बाल संगीत संमेलन* हरमल

.

*केरी पेडणेत ३ व ४ रोजी बाल संगीत संमेलन*

हरमल दि २
केरी तेरेखोल परिसर विकास कल्यान आणि शिक्षण संस्था, (पेडणे ) केरी गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्र, न्यू इंग्लिश हायस्कुल आणि कला व संस्कृती संचलनालय, पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि ३ आणि शनिवार दि ४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय बाल संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजतां केरीची ग्रामदैवत रवळनाथ देवाच्या मंदिरापासून शाळेत संमेलन स्थळापर्यंत मुलांची दिंडी होईल. ९ वा मांद्रे मतदार संघांचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व नाटककार किशोर नाईक गावकर, केरी गावच्या सरपंच धरती नागोजी व इतर मान्यवर उपस्थित राहतील.

पहिल्या सत्रात न्यू इंग्लिश हायस्कुलच्या मुलांचा स्वर धारा व स्वर साधना हा सांगितीक कार्यक्रम होईल.
दुसऱ्या सत्रात ११.३० वाजता गोव्यातील सहा शाळांतील उत्कृष्ट गायन संघांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. न्यू इंग्लंश हायस्क्युलने यावर्षी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अखिल गोमंतकीय आंतर शालेय सुगम संगीत स्पर्धा घेतलेली. त्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण केलेल्या शाळांची यावेळो गायनाची मैफल भरविली जाणार आहे.

संध्याकाळी ६.३० वाजतां न्यू इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे संगीत मत्स्यगंधा नाट्य प्रयोग सादर केला जाईल. यावेळी मांद्रे गावचे सरपंच ऍड. अमित सावंत उपस्थित राहतील.

दुसऱ्या दिवशी ४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता समारोप समारभास माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड रमाकांत खालप, कला व संस्कृती खात्याचे उप संचालक अशोक परब व अन्य मान्यवर हजर राहतील. यावेळी तसेच केरीतील नामवंत संगीत कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल..
त्यानंतर ६.३० वाजता न्यू इंग्लिश हायस्कुल विद्यार्थी संगीत कैकयी नाटक सादर करतील.
पालक, ग्रामस्थ व संगीत प्रेमिनी मोठ्या संख्येने दोन दिवसीय बाल संगीत संमेलनाला उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar