केरी बाल संगीत संमेलनात 4 रोजी जेष्ठ कलाकारांचा सत्कार,आज समारोप

.

केरी बाल संगीत संमेलनात 4 रोजी जेष्ठ कलाकारांचा सत्कार,आज समारोप

हरमल प्रतिनिधी

केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण व शिक्षण संस्था संचलित केरी गांधर्व  महाविद्यालय परीक्षा केंद्र, न्यू इंग्लिश हायस्कूल व कला संस्कृती संचालनालय पणजी यांच्या विद्यमाने बाल संगीत संमेलनाचा शनिवार 4 नोव्हेबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता,न्यू इंग्लिश सभागृहात समारोप कार्यक्रम होणार आहे.

ह्या समारोप सोहळ्यात केरी गावातील संगीत कलाकार शरद मठकर,महेंद्र नार्वेकर,बुध्देश तळकर,राघोबा च्यारी, दिलीप रेडकर,वंदना सावंत, भरत पेडणेकर,सुहास सोपटे व रुपेश कुबल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.ह्या कलाकारांनी गावात अनेक कलाकार घडवले असून त्यांच्या कार्याची दखल घेत न्यू इंग्लिश संस्थेने सत्काराचे आयोजन केले आहे.ह्या सोहळ्यास माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, कला संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तदनंतर संध्याकाळी 6.30 वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे संगीत “कैकयी”
नाटक सादर करतील.
तरी पालक,ग्रामस्थ, संगीतप्रेमिनी व आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केरी न्यू इंग्लिश हायस्कूल व्यवस्थापनाने केले आहे.

फोटो
9 कलाकार

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar