गोव्यातील नामवंत शाळांची केरीत बहारदार सुगम संगीत मैफल*

.

*गोव्यातील नामवंत शाळांची केरीत बहारदार सुगम संगीत मैफल*

हरमल दि ३

केरी पेडणे येथील केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणी शिक्षण संस्था आणि कला व सांस्कृतिक संचनालय, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल संगीत संमेलनात गोव्यातील सर्वोत्कृष्ट सहा शाळांचा बहारदार सुगम संगीताचा कार्यक्रम सम्पन्न झाला.

केरी न्यू इंग्लिश विद्यालयाच्या सभागृहात सुरु असलेल्या दोन दिवसीय संगीत सम्मेलनानिमित्त आयोजित केलेल्या या संगीत मैफलीत पणजी मुष्ठिफंड हायस्कुल, शिओली सडये श्री शांता विद्यालय, पेडणे श्री भगवती हायस्कुल, मांद्रे हायस्कुल, आणि हरमल पंचक्रोशी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सदाबहार सुगम संगीत मैफलीत एकापेक्षा एक सरस भावगिते, भक्तीगीते, अभंग व नाट्यगीते सादर करून उपस्थित रसिकांची मने रिझवली.

मुष्ठिफंड विद्यालयाच्या उर्वी वनस्कर, अनुजा बुगडे, प्रणित महाजन, दामोदर बेळगांवकर, नंदिनी चारी, नमिता काणकोणकर, भगवती हायस्कुलच्या सिद्धांत गोंधळी, संजना पेडणेकर, बाळकृष्ण धुरी, दत्ताराज चारी, शांता विद्यालयाच्या कशिश दाभोलकर, श्रेयशी महालदार, प्रियांका कारभारी, सुरेश केरकर, नारायण चारी, हरामल पंचक्रोशीच्या साना साटेलकर, स्वरा नाईक, मैथिली चारी, मकरंद परब, जिग्नेश पेडणेकर, दशरथ नाईक, नादब्रह्म कोरगावच्या यश शेट्ये, उत्कर्ष पालयेकर, वीणा केरकर, सावी शेट्ये, आसावरी शेट्ये, यशवंत शेट्ये आणि मांद्रे हायस्कुलच्या सान्वी देसाई, सान्वी हरमलकर, हर्ष मांद्रेकर, सोमनाथ पार्सेकर, अविनाश गडेकर या विद्यार्थी, व शिक्षक कालाकारांनी सुगम संगीत मैफल यशस्वी केली.

यावेळी केरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, खजिनदार मिलिंद तळकर व मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानीत करण्यात आले. संपूर्ण मैफलीचे निवेदन शिक्षक नवसो परब यांनी केलं.

फोटो
केरी पेडणे येथे सुगम संगीत मैफलीत सादरीकरण केलेल्या विद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करताना मिलिंद तळकर, विठ्ठल गाडेकर व भावार्थ मांद्रेकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar