न्यू इंग्लिश हायस्कुलची अभ्यास सहल हैद्राबादला रवाना
हरमल दि ६
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलची अभ्यास सहल हैद्राबाद तेलंगाणा येथे रवाना झाली. पाच दिवसीय शलीत विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असून दि १० रोजी ते गोव्यात परततील.
देखण्या बागा, नयनरम्य तलाव आणि इतिहास,स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नजराणा ठरलेल्या हैद्राबाद शहरात भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सालारजंग हे संग्रहलय, एन टी आर बगीचा, लुबिनी पार्क, रामोजी फिल्म सिटी, गोळकोडा किल्ला, चारमीनार आदी स्थाळाना यावेळी भेट दिली जाणार आहे. तसेच शिक्षक गुरुप्रसाद तांडेल,आल्फ्रेड रॉड्रीगीज, सत्यवान हर्जी, यशवंत पेडणेकर,नीलम महालदार, शर्मिला नाईक, सलोनी हर्जी, शमा गडेकर, रितेश भाटलेकर, साईश गाड, जेफेरीन रॉड्रीगीज व मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर हैद्राबाद दौऱ्यात सहभागी झाले आहेत अशी माहिती असे अभ्यास सहल प्रमुख गुरुप्रसाद तांडेल यांनी दिली.
फोटो
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुल अभ्यास सहलीसाठी हैद्राबादला रवाना.