वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

.
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
                                                                               वसुबारस (गोवत्स द्वादशी)
श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.
या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.
इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
उद्देश : या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.
सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करावी का ? पूजा करणे शक्य नसल्यास काय करावे ? :
वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करण्यास अडचण असेल, तेव्हा घरी एखादी गायीची मूर्ती असल्यास तिची पूजा करावी. घरी मूर्ती नसल्यास गायीचे पाटावर चित्र काढून त्याची पूजा करावी.
गोपालनाचे महत्त्व ! : पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्वतर्‍हेचे प्रदूषण गंभीररित्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एकप्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे. वसुबारस या सणाच्या निमित्ताने गोमातेचे महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया.
गुरुद्वादशी : आश्विन वद्य द्वादशी या तिथीला शिष्य गुरूंचे पूजन करतात.
संदर्भ : सनातन संस्थेचा  ग्रंथ ‘सण,धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलक : श्री. तुळशीदास गांजेकर
( संपर्क क्रमांक : ९३७०९५८१३२)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें