चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक ! – महर्षि

.
रामटेक येथे ‘संगीत चिकित्सेमध्ये भारतीय संगीताचे महत्व !’ या विषयावरील संशोधन सादर
चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष

      नागपूर – संगीत ही मानवजातीला परमेश्वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहेसंगीताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतोईश्वराशी एकरूपता अनुभवू शकतोमात्र सध्या संगीताला अशांती अन् पतन यांचे माध्यम बनवले जात आहेअशी चिंता जगभरातील समाजशास्त्रज्ञ सातत्याने व्यक्त करत असतातभारतीय शास्त्रीय संगीत विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी कमी करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहेअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद कुतेजल पात्रीकर यांनी केले. त्या रामटेक (नागपूरयेथील ‘कवीकुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ’ यांनी आयोजित केलेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम – फ्यूचर डायमेंशन’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ऑनलाईन बोलत होत्यात्यांनी या परिषदेमध्ये ‘संगीत चिकित्सेमध्ये भारतीय संगीताचे महत्व !’ या विषयावर शोधनिबंध सादर केलामहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉजयंत आठवले हे या शोधनिबंधाचे मार्गदर्शकतर कुतेजल पात्रीकर या लेखिका आहेत.

संगीत विशारद कुतेजल पात्रीकर पुढे म्हणाल्या की, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने उच्च रक्तदाबाचा विकार असणार्‍या व्यक्तींवर भारतीय शास्त्रीय संगीतदेवतांचा नामजपबीजमंत्रॐकारतसेच विदेशांतील ‘मार्काेनी युनियन’चे ‘वेटलेस’ या संगीताचा काय परिणाम होतोयाचा अभ्यास करण्यात आलासध्या ‘मार्काेनी युनियन’ हे ताण हलका व्हावा आणि ‘वेटलेस’ हे रक्तदाब कमी होण्यासाठी जगप्रसिद्ध आहेतया संशोधनात्मक चाचणीसाठी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उच्च रक्तदाब असलेल्या काही रुग्णांना निवडण्यात आलेसंशोधनासाठी ‘युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर’चा वापरही करण्यात आला.

या प्रयोगात भारतीय संगीतातील ‘राग गोरखकल्याण’ ऐकल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांचा रक्तदाब मोजण्यात आलात्या वेळी पैकी जणांचा रक्तदाब संगीत ऐकण्‍यापूर्वीच्‍या त्यांच्या रक्तदाबाच्या तुलनेत घटला होताएकाचा रक्तदाब सामान्य होता. ‘वाढलेल्या रक्तदाबामध्‍ये घट झाली आणि 72 घंटे औषधोपचार न करताही ती टिकली’हे वैशिष्ट्यपूर्ण आहेसंगीत ऐकल्यानंतर व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा सरासरी 60 टक्के घटली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत सरासरी 155 टक्के वाढ झालीअसाच परिणाम शास्त्रीय संगीतासह देवतांचा नामजपबीजमंत्र आणि ॐकार यांच्या ऐकण्याचाही रूग्णांवर झाला.

या संशोधनामध्ये ब्रिटीश बँड ‘मार्कोनी युनियन’चे ‘वेटलेस’ असलेले रिलॅक्स म्युझिकही ऐकवलेया प्रयोगानंतरही दोघांचा रक्तदाब कमी झालामात्र दोघांच्या नाडीचे ठोके वाढलेतसेच यू..एस्यंत्राद्वारे केलेल्या चाचणीत त्यांच्या नकारात्मकतेत सरासरी 53 टक्के वाढ झालीतर एकाची सकारात्मक प्रभावळ 53 टक्क्यांनी घटली आणि दुसर्‍याची सकारात्मक प्रभावळ पूर्णपणे कमी झालीयातून असे लक्षात आले कीभारतीय संगीत आणि नाद चिकित्सेतून व्याधी कमी होतातचत्यासह व्यक्तीची सकारात्मक प्रभावळ ही वाढतेतर विदेशी संगीतामुळे व्याधी जरी कमी होत असलीतरी सकारात्मकता कमी होऊन नकारात्मकतेत वाढ होतेभारतीय संगीत किंवा नाद यांमध्ये मुळातच सकारात्मक ऊर्जा (चैतन्यआहेयाचा परिणाम दुरगामी टिकणारा असतोभारतीय संगीतामुळे रुग्णांना सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात मिळत असल्याने त्यांची रोगप्रतिकार क्षमताही वाढतेतसेच कोणता ‘साईड इफेक्ट’ होत नाहीत.


आपला नम्र,
श्री. आशिष सावंत,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 9561574972)

—————————————————————————— 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar