जो आनंद नाटकातून मिळतो त्याची तुलनाच होऊ शकत नाही. नाट्यकलाकार नाटकाद्वारे समाज प्रबोधन करीत असतात : निवृत्त न्यायाधीश तथा नाटककार अँड. राजेश नार्वेकर

.

जो आनंद नाटकातून मिळतो त्याची तुलनाच होऊ शकत नाही. नाट्यकलाकार नाटकाद्वारे समाज प्रबोधन करीत असतात : निवृत्त न्यायाधीश तथा नाटककार अँड. राजेश नार्वेकर
म्हापसा (न. प्र.):-कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरताना निस्वार्थ सेवा देण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. हे कलाकार पैशाच्या मागे धावत नाहीत.संस्कृती संवर्धन व्हावे म्हणून अविरत मेहनत करताना. जो आनंद नाटकातून मिळतो त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आज आपली संस्कृती विकृतीकडे पोहोचत आहे. अशावेळी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षणाची नितांत गरज आहे.अध्यात्मिक गुरु काम करीत आहेत. नाटकाच्या द्वारेही समाज प्रबोधन आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश तथा नाटककार अँड. राजेश नार्वेकर यांनी म्हापसा येथे केले.
सम्राट क्लब म्हापसा याने रंगभूमी दिनाचे औचित्त साधून घाटेश्वरनगर खोर्ली म्हापसा येथे श्रीकृष्ण देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ तियात्रीस फिलीफ डायस,नाट्यकलाकार सम्राट प्रा.गोविंदराज देसाई व नाट्यलेखक तथा नाट्यकलाकार गौरव कुबल यांच्या सत्कार समारंभावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने राजेश नार्वेकर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत सम्राट क्लबचे अध्यक्ष सम्राट विनोद सांगोडकर, सचिव सम्राट रामा रेवणकर,प्रकल्प अधिकारी तथा खजिनदार सम्राट प्रकाश धुमाळ,माजी अध्यक्ष सम्राट संदीप वालावलकर,माजी खजिनदार सम्राट रितेश कारेकर, सम्राट अभय हजारे, सम्राट नितीन नेवगी, सम्राट दीपक डांगी, सम्राट विनोद मळीक, सम्राट सागर नार्वेकर, सम्राट योगेश हिरवे, सम्राट प्रकाश ताम्हणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते
पुढे बोलताना अँड. राजेश नार्वेकर म्हणाले की,आजची नवनवीन तरुण-तरुणी नाटकाच्या क्षेत्रामध्ये येत नाहीअसे म्हणतो .ते खोटे असून आजची पिढी नाट्य क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वावरत असल्याचे दिसून येते. नाटकात जो कलाकार रंगमंचावर उभा राहून कला सादर करतो तो कोर्टात वकील उभा राहुन एखाद्यावर आपला दावा करीत असल्यासारखा करीत असतो. सत्कार कुणाचा व्हावा सत्कार कर्तव्याचा कलेचा आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्याचा व्हावा. वाद्य हे वाद्यावर अवलंबून नसते तर वादकावर अवलंबून असते. नाटकाच्या द्वारे नाट्यकलाकार समाज प्रबोधन करीत असतात .असे उदगार निवृत्त न्यायाधीश तथा नाटककार अँड. राजेश नार्वेकर यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना तियात्रीस फिलिफ डायस यांनी सांगितले की,परमेश्वराने जी कला दिली ती आपण कशी वापरावी याची माहिती मिळवण्यासाठी व्यासपीठाची आज गरज आहे. आजच्या युवकांनी आपल्या अंगातील कला गुण पुढे नेण्याची गरज आहे. ज्या सांस्कृतिक संस्था कलेसाठी कलाकारांना पुढे येण्यासाठी वाव देतात त्याचा वापर करून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान दुसरे सत्कारमूर्ती प्रा सम्राट गोविंदराज देसाई यांनी सांगितले आपण समाजात कसे कार्य करू शकतो. समाजात आजचे विद्यार्थी कसे असावे त्यांच्याजवळ सर्वतर्हेची कला असणे आवश्यक आहे. जे युवक कार्य करत आहे त्यांच्यासाठी सम्राट क्लब म्हापसा सतत त्याच्या पाठीशी असेल.संस्कृती संवर्धनासाठी सम्राट क्लब म्हापसा आपले कार्य पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले नवीपिढी नाटके बंद होत होती ती पुढे नेण्याकडे येत असल्याचेही गौरव उदगार त्यांनी काढले.
यावेळी एकपात्री अभिनय स्पर्धा युवक युवतीसाठी आयोजित करण्यात आली होती त्यात पुढील स्पर्धकांनी बक्षिसे पटकाविली.प्रथम अस्मिता हजारे, दुसरे स्वाध्या आपटे, तृतीय पार्थवी पाळणी उतेजनार्थ शर्वी नाईक,श्रावणी केळकर , संदीप पाळणी व रोहित बेलवटकर यांना देण्यात आली.परीक्षक म्हणून युवांकुर कर्पे व योगेश हिरवे यांनी काम पाहिले. प्रारंभी प्रमुख पाहुणे अँड. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते व सत्कारमूर्तिच्या हस्ते दीपप्रज्योलीत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.व सत्कारमूर्ती फिलीफ डायस प्रा. सम्राट गोविदराज देसाई व वैभव कुबल यांचा शाल, श्रीफळ, फळफळावळाची पर्डी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.क्लबचे अध्यक्ष सम्राट विनोद सांगोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. सत्कारमूर्तीची ओळख सचिव सम्राट रामा रेवणकर यांनी करून दिली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख माजी अध्यक्ष सम्राट संदीप वालावलकर यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी तथा खजिनदार सम्राट प्रकाश धुमाळ यांनी मानले.
फोटो :- सम्राट क्लब म्हापसा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंगभूमिदिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या सत्कारमूर्ती व स्पर्धाकासमवेत अँड. राजेश नार्वेकर व क्लबचे पदाधिकारी.(छाया :-प्रणव फोटो )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar