जागतिक आयुर्वेद दिनाच्या आणि धन्वंतरी पूजन निमित्ताने मंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा केला गोवा येथे सत्कार,

.

जागतिक आयुर्वेद दिनाच्या आणि धन्वंतरी पूजन निमित्ताने मंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा केला गोवा येथे सत्कार,
आयुर्वेदिक डॉक्टर, क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी नैसर्गिक जीवनमूल्यांसाठी आयुर्वेदाचा अवलंब करण्याची व त्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याची घेतली शपथ,
आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती आणि आयुर्वेदाच्या प्रसारामध्ये कार्यरत असलेले या कार्यक्रमाचे आयोजक ‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ने श्री धन्वंतरी प्रकटदिनानिमित्त केले धन्वंतरी पूजन,
आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासाठी तसेच हा प्राचीनकालीन वारसा पुढे घेवून जाण्यासाठी कार्यरत आहोत- केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नाईक

गोवा : आयुर्वेद क्षेत्रातील १२४ वर्षांचा वारसा असलेली नामवंत कंपनी ‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’च्या वतीने आयुर्वेद देवता भगवान श्री धन्वंतरी प्रकट दिनी श्री धन्वंतरी पूजनाचे आयोजन शानिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून यावेळी आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा, आयुर्वेद प्रचार व प्रसार करणाऱ्या माननीय वैद्यांचा सत्कार केंद्रीय पर्यटन, बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला श्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर डॉ सुजाता कदम, अधिष्ठाता, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, धारगळ, गोवा या सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ महेश वेर्लेकर, राज्य परवाना प्राधिकरण (आयुर्वेद) अन्न व औषध प्रशासन संचालनालय आणि श्री अभिषेक प्रविमल, प्रबंध निदेशक आईडीसी, गोवा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभाचे आयोजन दिवाळीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते आणि त्याला निमित्त होते ते राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे. हा दिवस आयुर्वेदाच्या शास्त्राला समर्पित करण्यात आलेला आहे. यावेळी नामांकित आणि मान्यवर वैद्यांचा सत्कार समारोह ११ नोव्हेंबर रोजी गोवा येथे आयोजित करण्यात आला होता.

ज्यांचा सत्कार करण्यात आला ते डॉक्टर, या समारंभाला उपस्थित असलेले मान्यवर यांनी यावेळी नैसर्गीक जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक जीवनशैली व अन्नपद्धती यांचा अवलंब करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्याशिवाय आयुर्वेदातील रोगनिवारक आणि उपचार पद्धती यांचा अवलंब करत स्वतःचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याची तसेच इतरांना आयुर्वेदाचा अवलंब करत स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची शपथही त्यांनी यावेळी घेतली.

श्री श्रीपाद नाईक म्हणाले, “अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या कार्यक्रमाला मला हजेरी लावता आली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ‘साण्डू’ ही आयुर्वेदाच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत व आघाडीची कंपनी असल्याने या पुरस्कारांचे महत्त्व वेगळेच आहे. आपण सर्व आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासाठी तसेच हा प्राचीनकालीन वारसा पुढे घेवून जाण्यासाठी कार्यरत आहोत.

‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ दरवर्षी आयुर्वेदातील प्रतिभावान आणि प्रख्यात अशा डॉक्टरांचा त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दरवर्षी सत्कार करते. डॉ के नागराजा समागा, डॉ आसावरी देशपांडे नाईक, डॉ जोसेफ फर्नांडीस, डॉ रोहित बोरकर, आणि डॉ सपना सावल या डॉक्टरांचा यंदाच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. एका विशेष अशा समारंभात ‘साण्डू
फार्मास्युटिकल्स लिमिटेड’तर्फे श्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ के नागराजा समागा आयुर्वेद मेडिकल इंस्टीट्युटमधील माजी अध्यापक असून ते गेली २८ वर्षे एक निष्णात आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून गोवा येथे कार्यरत आहेत. ते गुजरात आयुर्वेद युनिव्हार्सिटी, जामनगर (१९९५) मधून एमडी झाले. त्याशिवाय ते क्लिनिकल हिप्नोथेरपीमध्ये मास्टर हिप्नोटीस्ट आहेत. त्याशिवाय त्यांनी हिप्नोथेरपी मोडॅलीटीजमध्ये आधुनिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. डॉ समगा यांची स्पेशालिटी ही नॅचरोपथीमध्येही असून त्यांचा भर हा हार्मोनचे संतुलन यावर असतो. नैसार्विक नियमांना अनुसरून मानवी शरीराचे जे मुलभूत घटक आहेत, त्यावर ते भर देतात.

डॉ आसावरी देशपांडे नाईक या आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. ते आयुर्वेदातील एक परिपूर्ण असे डॉक्टर तर आहेतच पण त्याशिवाय त्यांची ख्याती एक व्यावसायिक व उद्योजक म्हणूनही आहे. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास १९९७ साली त्यांनी बीएएमएस आणि जीएएमअँडआरसी पदवी घेतली तेव्हाच झाला.

डॉ जोसेफ फर्नांडीस यांनी आयुर्वेद आणि आरोग्य निगेच्या क्षेत्रात जी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे, त्यासाठी तसेच कित्येक लोकांच्या आयुष्यात त्यांनी जो सकारात्मक बदल घडवून आणला आहे, त्यासाठी त्यांचा सत्कार केला जात आहे. डॉ फर्नांडीस यांचे वैशिष्ट्य हे जीवनशैलीशी संबंधी रोगांवर उपचार करणे हे आहे. त्यात मधुमेह, हायपर टेन्शन आणि इनसोम्निया यांचा समावेश असून त्याद्वारे त्यांनी आपल्या रुग्णांच्या आयुष्यत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे.

डॉ रोहित बोरकर यांनी आयुर्वेदाचा जो प्रसार केला आहेत आणि लोकांना त्यांचे गुणधर्म जे पटवून दिले आहेत, त्याला तोड नाही. आपल्या या कार्यासाठी ते स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, फ्रांस, हॉलंड, पोर्तुगाल आणि आयर्लंड आदी देशांना भेटी देतात आणि तेथील लोकांमध्ये आयुर्वेद व भारतीय संस्कृतीचा प्रसार करतात. डॉ बोरकर यांनी भारताबाहेरील लोकांना आयुर्वेदाच्या फायद्याचा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्याशिवाय भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देत त्यांना भारताला भेटी देण्यासाठी प्रेरित केले आहे.

डॉ सपना सावल यांनी बीएएमएस ही पदवी गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र, शिरोडा, गोवा येथून घेतली. त्यांनी पंचकर्मातील फेलोशिप अभ्यासक्रम पुणे येथून पूर्ण केला. डॉ सावल यांचे वैशिष्ट्य हे हाड व सांध्यांचे रोग, चयापचय विकार, मासिक पाळीसंबंधी विकार आणि त्वचा विकार यांमधील उपचार हे आहे.

‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक श्री उमेश साण्डू यांनी सर्व सत्कारमूर्तींनी जे अमूल्य काम केले आहे, त्याबद्दल हा त्यांचा सत्कार असल्याचे गौरवोद्गार काढले. “आयुर्वेदाच्या प्रसारामध्ये कित्येक वैद्य हे कार्यरत आहेत. कोविड-१९ मध्ये युवा आणि अनुभवी डॉक्टरांनी अगदी आव्हानात्मक अशा परिस्थितीत उत्तम असे कार्य केले आहे. या डॉक्टरांच्या या अतुलनीय अशा कामगिरीचा गौरव करणे या उद्देशाने हे सत्कार केले गेले. त्यातून त्यांचा हुरूप वाढवा, हे उद्दिष्ट त्यामागे आहे. ‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ने दरवर्षी अशाप्रकारच्या गुणवान डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे आणि तीच परंपरा आम्ही या सत्काराच्या माध्यमातून कायम ठेवली आहे,” ते म्हणाले.

१८९९मध्ये स्थापना झालेली आणि आयुर्वेदिक क्षेत्रातील १२० वर्षाहून अधिक वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेली ‘साण्डू फार्मास्युटीकल्स लिमिटेड’ ही आयुर्वेदाच्या क्षेत्रातील आघाडीची निर्मिती कंपनी आहे. आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या श्री भास्करराव साण्डू  यांच्या कारकीर्दीतच ‘साण्डू फार्मास्युटीकल्स’चा पसारा कैकपटीने वाढला. कंपनीचा विस्तार देशापलीकडे अनेक इतर देशांमध्ये झाला आणि उत्पादन १००० टक्क्यांनी वाढले.  कंपनीचे चेंबूर येथे सुसज्ज कार्यालय असून नेरूळ येथे अत्याधुनिक कारखाना आहे तर गोवा येथे महाकाय कारखाना आहे. ‘साण्डू फार्मास्युटीकल्स’ने अनेक आयुर्वेदिकेतर डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांची माहिती देवून त्यांना आयुर्वेदिकाभिमुख बनविले आहे.

हे प्राचीन उपचारशास्त्र जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्यातील औषधांचा देश आणि विदेशातील लोकांना लाभ मिळावा, यासाठी या क्षेत्रातील अनेक वैद्य अहोरात्र झटत असतात. समाजाच्या उदासीन प्रतिसादातही आर्थिक विवंचना सहन करत हे वैद्य आपली रुग्णसेवा अविरत चालू ठेवतात आणि आयुर्वेद शास्त्राची सेवा करतात. अशा वैद्यराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘साण्डू फार्मस्युटिकल्स’ गेली कित्येक वर्षे पुढाकार घेत आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सत्कार केला जातो. त्या माध्यमातून या डॉक्टरांचे कार्य समाजासमोर यावे, हा हेतू त्यामागे असतो. यंदाचे आयोजनही त्याच शृंखलेचा भाग आहे.
———————————————————————————————————–
Marathi Photo Caption
जागतिक आयुर्वेद दिनाच्या आणि धन्वंतरी पूजन निमित्ताने मंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा डॉ के नागराजा समागा, डॉ आसावरी देशपांडे नाईक, डॉ जोसेफ फर्नांडीस, डॉ रोहित बोरकर, आणि डॉ सपना सावल या डॉक्टरांचा सत्कार गोवा येथे केला .आयुर्वेदिक डॉक्टर, क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी नैसर्गिक जीवनमूल्यांसाठी आयुर्वेदाचा अवलंब करण्याची व त्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याची घेतली शपथ,आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासाठी तसेच हा प्राचीनकालीन वारसा पुढे घेवून जाण्यासाठी कार्यरत आहोत- केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नाईक
————————————————————————————————————-

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar