वाचनामुळे शब्द संपत्ती प्राप्त होते. त्या शब्द संपत्तीच्या जोरावर माणूस चांगली  वकृत्व कला संपादन करू शकतो

.
पणजी
वाचनामुळे शब्द संपत्ती प्राप्त होते. त्या शब्द संपत्तीच्या जोरावर माणूस चांगली  वकृत्व कला संपादन करू शकतो त्याच वक्तृत्वाच्या जोरावर चांगले कर्तृत्व सिद्ध करून दाखवू शकतो आणि त्याही पुढे जाऊन त्यात कर्तव्याच्या जोरावर समाजाला चांगले नेतृत्व देऊ शकतो म्हणूनच प्रत्येकाने अविरत वाचन करून आपली शब्दसंपदा वाढवली पाहिजे असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले .

बाल दिन राष्ट्रीय पुस्तक सप्ताह व राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने पाटो पणजी येथील   कृष्ण दास श्यामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री गावडे बोलत होते .
संस्कृती भवन मधील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित सात दिवशी वक्तृत्व स्पर्धेच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कला व सांस्कृत खात्याचे संचालक सगुण वेळिप उपसंचालक अशोक परब मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्येरेटर डॉ सुशांत तांडेल सहाय्यक राज्यग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे कार्यक्रम प्रमुख विजय पावसकर परीक्षक रामदास केळकर , भारत बेतकेकर व श्रुती हजारे इत्यादी  उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित   मार्गदर्शन करताना    श्री गावडे पुढे म्हणाले की वाचनातून थोडा मोठ्यांचा जिवंत संघर्ष लक्षात येतो व त्यातून अपयशालाही समर्थपणे पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते म्हणूनच प्रत्येकाने सातत्य पूर्वक वाचन करून आपल्या अंगभूत गुणांना वाव दिला पाहिजे असे गावडे पुढे म्हणाले . कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप मध्यवर्ती ग्रंथालयाचे डॉक्टर सुशांत तांडेल यांनी ही यावेळी समायोचीत भाषणे झाली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
कार्यप्रमुख विजय पावसकर यांनी सर्वांचे स्वागत केले सिद्धी गावकर व समूहाने स्वागत गीत सादर केले स्नेहल चोपडेकर यांनी सरस्वती वंदना सादर केले संपूर्ण कार्यक्रमात सूत्रसंचालन दीपिका शेट वेरेकर यांनी केले सहाय्यक राज्य  ग्रंथपाल     सुलक्षा  कोळमुळे यांनी आभार मानले कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी प्रांजली जोशी, सचिन नाईक ,आदित्य तारी रोहित फडते,सुनील कुंडईकर, नव्या   परवार ,राहुल मयेकर ,संतोष मयेकर  बेंटो वाज, नवनीत कुटृटीकर   इत्यादी विशेष परीक्षम घेतले.
फोटो बालदिन, राष्ट्रीय पुस्तक सताह निमित्त पाटो पणजी येथे उदघाटन करताना गोविंद गावडे, सगुण वेळीप, डॉ सुशांत तांडेल, अशोक परब, व परीक्षक

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar