उझबेकिस्तानमधील ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळयात चमकले गोव्याचे पर्यटन*

.

[15/11, 7:20 pm] Nikita: *Photo Caption*

Mr.Kishor sasolkar- Enterprenuer , Dr. Anand Tripathi, Advisor, Mr.Sagar Agni,Media Advisor to the Tourism Minister of Goa Shri. Rohan A. Khaunte,Mr. Manish Prabhat, the Ambassador of India to Uzbekistan, Mr.Dipak Narvekar, Deputy General Manager of the Goa Tourism Development Corporation (GTDC), Mr. Rajesh Badola, Head of the Consular Wing
[15/11, 7:20 pm] Nikita: *उझबेकिस्तानमधील ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळयात चमकले गोव्याचे पर्यटन*

ताश्कंद, उझबेकिस्तान, 15 नोव्हेंबर 2023: गोव्यातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पर्यटन आकर्षणे अधोरेखित करत, उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे सुरु असलेल्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यात गोवा पर्यटन शिष्टमंडळाने उत्साहाने भाग घेतला. संपूर्ण मध्य आशियाई प्रदेशातील सर्वात प्रमुख आणि विस्तृत कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळ्याने गोव्यातील पर्यटनाच्या विशिष्ट पैलूंचे प्रदर्शन करण्याची उत्कृष्ट संधी दिली.

उझबेकिस्तानमधील भारतीय दूतावासाने गोवा दालनाच्या उभारणीसाठी उदार हस्ते जागा उपलब्ध करून देऊन गोवा पर्यटनाला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उझबेकिस्तानमधील भारताचे राजदूत श्री मनीष प्रभात यांच्या हस्ते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे(GTDC) उपमहाव्यवस्थापक श्री. दिपक नार्वेकर, गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांचे माध्यम सल्लागार श्री.सागर अग्नी, डॉ. आनंद त्रिपाठी, कॉन्सुलर विंगचे प्रमुख राजेश बडोला, यांच्या उपस्थितीत गोवा पॅव्हेलियनचे शानदार शुभारंभ करण्यात आला.

उझबेकिस्तानमधील भारताचे राजदूत श्री मनीष प्रभात यांनी गोवा पर्यटनाला चालना देण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला आणि या प्रयत्नात उझबेकिस्तानकडून मदत देण्याचे आश्वासन दिले.

चर्चेदरम्यान, श्री मनीष प्रभात यांनी उझबेक नागरिकांसाठी दर्जेदार वैद्यकीय उपचारांकरीता गोव्याने पुढाकार घ्यावा असे सांगून गोव्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून पुढे आणण्याची सूचना केली. उझबेकिस्तान आणि नजीकच्या मध्य आशियाई देशांमधील टूर आणि ट्रॅव्हल एजंट्समध्ये गोव्याला प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

श्री मनीष प्रभात यांनी गोव्याच्या पर्यटनाच्या पारंपारिक कल्पनेच्या पलीकडे जाऊन, समुद्रकिनारे, योग, आरोग्य, आयुर्वेद, इको, अध्यात्मिक, वारसा पर्यटन आणि स्थानिक परंपरा आणि उत्सव यासह गोव्यातील वैविध्यपूर्ण पर्यायांचा प्रचार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. गोव्याच्या जुन्या पारंपरिक `चिखलकालो’ या चिखल महोत्सवाच्या पर्यटन खात्याच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) उपमहाव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर आणि गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांचे माध्यम सल्लागार श्री.सागर अग्नि यांच्या नेतृत्वाखाली गोवा पर्यटन शिष्टमंडळाने उझबेकिस्तान, चीन, कझाकस्तान, मॉस्को, दक्षिण कोरिया, मलेशिया, फ्रांस आणि इतर प्रदेशातील सीईओ एअरलाइन प्रतिनिधी, प्रमुख टूर आणि ट्रॅव्हल एजंट्स, चार्टर ऑपरेटर्ससोबत संवाद साधला. उझबेकिस्तानमधील चार्टर ऑपरेटर्सनी उझबेकिस्तान ते गोवा चार्टर्स चालवण्यास उत्सुकता व्यक्त केली.

गोवा पॅव्हेलियनला मेळ्यातील अभ्यागतांचा उदंड प्रतिसाद लाभला, ज्यामुळे ते ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्याचे आकर्षण ठरले. 1995 पासून जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) द्वारे हा मेळा जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना आकर्षित करतो.

16 नोव्हेंबर 2023 रोजी हॉटेल रामाडा, ताश्कंद येथे गोवा पर्यटन खात्यातर्फे सादरीकरण होईल, जिथे गुंतवणूक आणि प्रवासी भागीदार सक्रियपणे सहभागी होतील. कॉँकर्ड एकझॉटीक व्होयाजेस (Concord Exotic Voyages) या प्रमुख टूर ऑपरेटिंग एजन्सीने गोवा पॅव्हेलियनमध्ये सहभागी होऊन गोवा पर्यटनासाठी आपला पाठिंबा दर्शविला.

गोव्याचे सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्यासाठी अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या यशस्वी सहभागाचा फायदा घेऊन गोवा पर्यटन उझबेकिस्तान आणि शेजारील देशांशी मजबूत संबंध वाढवण्यास उत्सुक आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें