गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड करणारी पहिली परदेशी विमान कंपनी म्हणून ओमान एअरने गाठली नवीन उंची;

.

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड करणारी पहिली परदेशी विमान कंपनी म्हणून ओमान एअरने गाठली नवीन उंची;
ग्राउंड हँडलिंगच्या उत्कृष्ट सेवांसाठी सेलेबी इंडियासोबत भागीदारी
गोवा, १५ नोव्हेंबर, २०२३ : विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरविणाऱ्या सेलेबी या जागतिक स्तरावर प्रसिद्ध कंपनीने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओमान एअरसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा आज येथे करण्यात आली. ही भागीदारी महत्त्वपूर्ण आहे, कारण ओमान एअर ही उत्तर गोव्यातील वेगाने वाढणाऱ्या नवीन विमानतळावर उतरणारी पहिली परदेशी विमान कंपनी ठरली आहे.
गोव्यातील मोपा विमानतळ ते मस्कत या मार्गावर ओमान एअर ही एअरलाईन दर आठवड्याला चार उड्डाणे करणार आहे. सेलेबी इंडियाने ओमान एअरसाठी अखंडीत स्वरुपाची ग्राउंड हँडलिंग सेवा गेल्या दि. २९ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे कार्यान्वित केली व ही भागीदारी प्रत्यक्ष अमलात आली. सेलेबीचे ग्राउंड हँडलिंगमधील व्यापक कौशल्य आणि उत्कृष्ट सेवा देण्याची ओमान एअरची कटिबद्धता यांचा विलक्षण संयोग या भागीदारीच्या रुपाने जुळून आला आहे व त्यातून या उद्योगातील मानके पुन्हा परिभाषित झाली आहेत.
या संदर्भात सेलेबी ग्राउंड हँडलिंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौसीफ खान म्हणाले, “आम्ही भारतातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओमान एअरच्या ऐतिहासिक शुभारंभी उड्डाणाला सहकार्य देऊ केले, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या विमानतळावर उतरणारी ओमान एअर ही पहिली परदेशी विमान कंपनी ठरल्याने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक विश्वासार्ह ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदाता या नात्याने आम्ही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील आमच्या भागीदार एअरलाइन्सना उल्लेखनीय सेवा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. ओमान एअरसोबतची भागीदारी ही उच्चस्तरीय सेवा देण्यासाठी आणि भारताच्या विमान वाहतूक उद्योगाच्या वाढीस हातभार लावण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे.”
मोपा विमानतळावर आधुनिक पायाभूत सुविधा उभारून येथील सतत वाढणाऱ्या कारभारात सेलेबी इंडियाने आपले योगदान दिले आहे. सेलेबीकडे कुशल कर्मचाऱ्यांचे एक समर्पित असे पथक आहे आणि प्रवाशांना व्यावसायिक सहाय्य करण्यास ते सुसज्ज आहे. भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे या कंपनीचे नियोजन आहे.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, गोवा, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद व कन्नूर यांसारख्या प्रमुख विमानतळांवर सेलेबी इंडिया सध्या आपली सेवा देत असून चेन्नई विमानतळावरही सेवा देण्यास तिने नुकतीच सुरुवात केली आहे.
भारतात ग्राउंड हँडलिंग उद्योगात स्थिर झालेली सेलेबी इंडिया आता आघाडीवर आहे. विमान वाहतूक क्षेत्रात कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्यास ती समर्पित आहे आणि पर्यावरणपूरक सेवा सादर करून ती हे साध्य करीत आहे. प्रवाशांची ने-आण, बॅगेज व कार्गो ओढून नेणे, टॅक्सी-बॉट्स आणि ब्रिज-माउंट उपकरण सेवा यांमध्ये संपूर्णपणे विद्युत वाहनांचा उपयोग ती करीत आहे. यातून विमान वाहतूक उद्योगाला हरीत स्वरूप देण्यासाठीची कंपनीची कटिबद्धता स्पष्ट होते.
About Çelebi:
Çelebi is one of the world’s leading ground handling companies with over 65 years of experience in the industry. It has played a vital role in the transformation of aviation landscapes in the countries where it has operations, viz. Tanzania, Germany, Hungary, India, and Turkey. This global footprint gives Çelebi a distinguished place among the biggest European companies in the business. Çelebi is one of the largest independent ground handling companies in Europe and India as a full-service ground handling provider as per IATA standards. With over 13000 dedicated employees, Çelebi supports 300+ customers between 44 airports across the globe.

For further information and queries:

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें