सहकार साप्ताहनिमित्त आज बार्देश बाजार येथे कार्यक्रम

.

सहकार साप्ताहनिमित्त आज बार्देश बाजार येथे कार्यक्रम
म्हापसा दि १७ (प्रतिनिधी ):- बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटी तर्फे ७० व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन चेअरमन निखिलचंद्र खलप यांच्या हस्ते सहकार ध्वज लावून करण्यात आले.
या प्रसंगी संचालक एकनाथ नागवेकर, महादेव नाटेकर, नारायणा राठवड,बापू तुयेकर,प्रमोद कर्पे तसेच सरव्यवस्थापिका संजना राऊत, व्यवस्थापक अशोकराव ठाकूर व निवृत्त शिक्षक गिरिष दिवकर उपस्थित होते.
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी स्व. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिन असल्याने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रजलनाने सहकार सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. चेअरमन निखिल खलप यांनी पंडित जिंच्या कार्याची माहिती देत त्यांनीच भारतात सहकाराचे बीज पेरल्याची आठवण करून दिली गोव्यातही सहकार क्षेत्र फळावे फुलावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एकनाथ नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले तर नारायण राटवड यांनी आभार मानले.
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारच्या प्रांगणात सहकार सप्ताह पिक्चर संध्याकाळी पाच वाजता एक कार्यक्रम गोवा सहकार संघाच्या वतीने साजरा केला जाईल याची माहिती यावेळी देण्यात आली या कार्यक्रमास उपसभापती जोसेवा डिसोजा कार्य नगराध्यक्ष प्रिया मिशाळ नगरसेवक सुधीर कांदोळकर तसेच माजी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत खलप उपस्थित राहतील अशी माहिती चेअरमन खलप दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें