पेडणे व बार्देश तालुक्यातील ४७ सोसायट्या दिवाळखोरीत चौकशीचे आदेश :सहकारमंत्री सुभाष शिरोडकर

.

पेडणे व बार्देश तालुक्यातील ४७ सोसायट्या दिवाळखोरीत चौकशीचे आदेश :सहकारमंत्री सुभाष शिरोडकर


म्हापसा दि १९ (प्रतिनिधी ):- बार्देश मधील उपनिबंधक तर्फे म्हापश्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त ७०व्या कार्यक्रमावेळी गोवा राज्य सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की उत्तर गोव्यातील पेडणे तसेच बार्देश तालुक्यातून ४७ सहकार सोसायटी दिवाळीखोरीत काढण्यात आले आहेत.त्या मागची कारणे स्पष्ट होण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सदरचा कार्यक्रम मरड म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या समावेत उपनिबंधक सिताराम सावळ, डॉ.अमृत नाईक, म्हापसा कार्यालयाचे उपनिबंधक हरीश नाईक, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ उपस्थित होत्या. पुढे बोलताना सहकार मंत्री शिरोडकर म्हणाले की, दिवाळखोरीत निघालेल्या संस्थांपैकी ३५ बार्देश तर १५ पेडणे तालुक्यातील आहेत.यात विश्वासाने गुंतवणूक करणारे लोक हे सर्वसामान्य आहेत. म्हापसा अर्बन किंवा मडगाव अर्बन बँक दिवाळखोरीत निघणे हा त्यांच्या शहरावर लागलेला ठपका आहे.त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते ती दूर होण्यासाठी दिवाळी खोरीत निघण्यामागची कारणे शोधून काढली जाणार आहेत.त्याचा अहवाल १५ दिवसात सादर केला जाईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पेडणे तसेच बार्देश या दोन तालुक्यातील १ हजार ३२सहकार सोसायट्यांचा समावेश होतो. त्यातील ५०० हून जास्त हाऊसिंग क्षेत्रातील आहेत. हाऊसिंग सोसायटी वादविवाद होणारे अड्डे आहेत. त्यांच्यातील वादांचे पडसाद सहकार निबंधकांवर होतात हे कोणा सोसायटीतील ११४ स्वयंसेवा संघटना आहेत. त्या काम करणाऱ्या महिला अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे शिरोडकर यांनी व्यक्त केले.
राज्यातील १२ तालुक्यांचे सहा विभाग तयार करण्यात आले आहेत. या सर्व विभागांचा अहवाल तयार करण्याचे काम सहकार खात्यामार्फत घेण्यात आल्याची माहिती यावेळी दिली तसेच दर सहा महिन्यांनी सोसायटी यांच्या कामकाजांचा आढावा घेतला जाणार असल्यांची माहिती यावेळी दिली.सहकार क्षेत्रात जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरच सहकार क्षेत्राची समृद्धी झाल्याचे म्हणावे लागेल युवकांना सहकार क्षेत्रात उत्तेजन देण्यासाठी पुढील सहा महिन्यात कोर्स सुरू केला जाणार असल्याची माहिती ही मंत्री शिरोडकर यांनी दिली.
राज्यात दूध डेअरी तसेच भाज्यांचे उत्पादन कमी असल्याने लोकांच्या गरजा भागवण्यासाठी दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांचा महसूल शेजारील राज्यांना द्यावा लागतो.त्यामुळे अशा क्षेत्रांचे उत्पादन राज्यात घेऊन युवकांना मार्गदर्शन दिल्यास बराच लाभ होऊ शकतो असेही शिरोडकर यांनी यावेळी म्हणाले. प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना डॉ. अमृत नाईक यांनी आज सहकार क्षेत्रामध्ये होत असलेल्या चळवळीबद्दल विषयावर मार्गदर्शन केले. तर नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पेडणे व बार्देश तालुक्यातील चेअरमन व व्हाईसचेअरमन यांचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये गजानन राणे फाउंडर मेंबर,रवींद्र राऊत चेअरमन प्रकाश धुमाळ व्हाईस चेअरमन, प्रेमानंद प्रभू चेअरमन,प्रेमनाथ मावळीकर चेअरमन, रत्नपाल साळकर व्हाईस चेअरमन,अर्जुन खरबे मॅनेजर, ज्ञानेश्वर नार्वेकर मॅनेजर,अनिल गोवेकर,लीना नाईक, रस्मिता बगळी स्टाफ, फ्रान्सिको सिलवेरा मॅनेजर, लुईस फर्नांडिस यांचा यात समावेश होता . त्याचप्रमाणे पेडणे व बार्देश तालुक्यातील क्रेडिट सोसायटीने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांचे आणि उपस्थित यांचे नाट्यरंभ स्कूल आर्ट्स मोरजी पेडणे यांनी स्वागत गीता सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक भाषण म्हापसा कार्यालयाचे उपनिबंधक हरिष नाईक यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सिया कुंडईकर,प्रियल वाळके, तनशु नार्वेकर,आरती महाले,शितल शिरोडकर, यांनी स्वागत केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धारगळ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हाईसचेअरमन प्रकाश धुमाळ यांनी केले व शेवटी त्यांनीच आभार मानले.
फोटो :-सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, उपनिबंधक सीताराम सावळ, हरीश नाईक, डॉ. अमृत नाईक, प्रिया मिशाळ याच्यासमवेत सत्कारमूर्ती.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar