*टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो २०२३चे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर 2023 रोजी उद्घाटन*

.

*टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो २०२३चे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर 2023 रोजी उद्घाटन*

– एक्स्पो दरम्यान आयोजित करण्यात येणार्‍या उद्योग प्रतिनिधींसोबत मास्टरक्लासेस, स्टार्टअपसाठी संस्थापकांची बैठक आणि गोलमेज चर्चासत्राचे आयोजन

*पणजी, 20 नोव्हेंबर 2023*: गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला बहुप्रतिक्षित टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात आनंद होत आहे. हा एक्स्पो 21 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान योग सेतू प्रोमेनेड, भगवान परशुराम पुतळ्याजवळ, पणजी, गोवा येथे होणार आहे. गोव्यातील स्टार्टअप्ससाठी एक प्रमुख व्यासपीठ असलेल्या एक्स्पोचे उद्घाटन माननीय पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांच्या हस्ते होणार आहे.

टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो 2023 हा स्टार्टअप इकोसिस्टममध्ये नावीन्य आणि सहयोगाला चालना देण्यासाठी गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेला एक प्रमुख कार्यक्रम आहे. एक्स्पो उदयोन्मुख स्टार्टअप्ससाठी त्यांचे तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी, उद्योग तज्ञांशी संपर्क साधण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्याच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. हा एक्स्पो 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑफ गोवा (IFFI) च्या संयोगाने आयोजित केला जाईल, ज्यामुळे एक्स्पो मध्ये सहभाग घेणाऱ्या आणि उपस्थित राहणाऱ्या दोघांचा अनुभव समृद्ध करेल.

एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी Infloo, Bantagram, Cinedubs, Mugafi, Producer Bazaar.com, ShortFundly, OTT Marketplace, Startbuzz.ai, TiltLabs आणि The Matic यासारखे स्टार्टअप्स दाखवले जातील. निर्णायक पॅनेलमध्ये प्रतिष्ठित व्यावसायिक आणि तज्ञांचा समावेश असेल. तिसर्‍या दिवशी कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल ज्यामध्ये डान्सिंग अॅटम्स स्टुडिओच्या सीईओ सुश्री सरस्वती वाणी बालगम यांच्या स्टार्टअप्ससाठी मास्टरक्लासचा समावेश असेल. त्यानंतर संध्याकाळी स्थानिक स्टार्टअप्स आणि एक्स्पोमध्ये उपस्थित असलेल्या एक संस्थापकांची बैठक होईल. दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांच्याशी गोलमेज चर्चा आणि त्यानंतर समारोप समारंभ संपन्न होईल.

हा एक्स्पो सर्वांसाठी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत खुला आहे आणि उपस्थितांना कार्यक्रमामध्ये दाखवल्या जाणार्‍या स्टार्टअप्सना एक्सप्लोर करण्याची आणि त्यात सहभागी होण्याची भरपूर संधी उपलब्ध करून देत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar