एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला अत्याधुनिक असा α६७०० कॅमेरा बाजारात आणण्याची सोनी इंडियाची घोषणा

.

एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला अत्याधुनिक असा α६७०० कॅमेरा बाजारात आणण्याची सोनी इंडियाची घोषणा
आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या वस्तूची प्रतिमा टिपायची आहे ते अतिशय स्पष्ट आणि निश्चितपणे ओळखणे आणि स्थिर फोटो व चलचित्रांची नवीनतम व आधुनिक प्रस्तुती करणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच एका आटोपशीर व नेटक्या एपीएस-सी कॅमेऱ्यामध्ये संक्षेपित केले गेले आहे.

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर, २०२३: सोनी इंडियाने आज एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला, अत्याधुनिक असा त्यांचा सर्वात नवीन α६७०० (ILCE-6700) कॅमेरा बाजारात आणण्याची घोषणा केली. फूल फ्रेम अल्फाटीएम आणि सिनेमा लाइन मालिकेच्या आधुनिक कॅमेऱ्यांमधील फोटो आणि व्हिडीओ टिपण्याची अग्रगण्य क्षमता आणि त्याचबरोबर α६७०० मालिकेतील कॅमेऱ्यांचा नेटका व आटोपशीरपणा आकार व वजनाने हलके असणे हे सर्व या नवीन कॅमेऱ्यामध्ये एकत्रित आल्याने सोनीचा हा α६७०० (ILCE-6700) आतापर्यंतचा सर्वात प्रगत असा एपीएस-सी मिररलेस कॅमेरा आहे. सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह २६.० प्रभावी मेगापिक्सेलचा एपीएस-सी बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (APS-C back-illuminated Exmor R® CMOS image sensor) यांना एकत्र करून α६७०० कॅमेरा अपवादा‍त्मक अश्या अप्रतिम प्रतिमा टिपतो आणि त्याचबरोबर हा कॅमेरा वजनाने हलका व नेटका असल्याचा फायदाही वापरकर्त्याला मिळतो.
१२०एफपीएस१ पर्यंत चित्रीकरण करणाऱ्या उच्च रिसोल्युशनच्या ४के व्हिडिओंना हा कॅमेरा पूरक आहे. अवघड परिस्थितीमध्ये किंवा कमी उजेडामध्ये बारकाईने तपशील टिपण्यासाठी व्यापक अक्षांशाच्या १४पेक्षा जास्त स्टॉप्स२ यात असून या कॅमेऱ्यामध्ये एस-सिनेटोनटीएम (S-Cinetone™) पिक्चर प्रोफाइल आहे; जे कलर ग्रेडिंगची गरज नसलेले व त्रुटीविरहित, उत्कृष्ट मूव्ही इमेजरी मिळविण्यासाठी सोनीच्या खास व्यावसायिक सिनेमालाइनमध्ये असते. हे माणसाच्या त्वचेच्या टोनचे अचंबित करणारी प्रस्तुती देते.
आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्याची प्रतिमा टिपायची आहे ती वस्तू किंवा व्यक्ती अतिशय अचूकपणे ओळखते:
या कॅमेऱ्यामध्ये अतुलनीय अशा प्रतिमा मिळविण्यासाठी सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह नवीन एपीएस-सी (APS-C) आकार, अंदाजे २६.० प्रभावी मेगापिक्सेल असलेले बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (back-illuminated Exmor R® CMOS image sensor) आहे. स्थिर चित्र आणि चलचित्र या दोहोंसाठी स्टँडर्ड आयएसओ (ISO) संवेदनशीलता १०० पासून ते ३२,००० पर्यंत आहे, ज्यामुळे चित्रीकरणात उच्च संवेदनशीलता आणि आजूबाजूचा कमी गोंगाट येतो. समृद्ध रंगछटांमुळे झाडे आणि व्यक्ती जास्त नैसर्गिक रंगात चित्रित होतात. तसेच क्रिएटिव्ह लुक या वैशिष्ठ्यामुळे अप्रतिम असे व्युज्यूअल भाव टिपले जातात. “α7R V” कडून आलेल्या एआय प्रोसेसिंग युनिटमुळे अतिशय अचूक “रिअल टाइम रेक्गनिशन एएफ” (ऑटोफोकस) देते. α६००० मालिकांच्या माध्यमातून प्राणी आणि माणसाला ओळखण्याच्या गुणधर्माच्या पलिकडे जाऊन हा कॅमेरा आता माणसे, प्राणी, पक्षी, कीटक, ट्रेन, कार, विमान यांसारखे वेगवेगळे विषय अचूकपणे ओळखतो. नुकत्याच बाजारात आलेल्या एफई ७०-२००एमएम एफ४.० जी मॅक्रो ओएसएस II३ बरोबर हे जोडल्यास हा कॅमेरा ३५एमएम फूल फ्रेम एवढे १०५ एमएम ते ३०० एमएम फोकल लेंथ देतो. उच्च गुणवत्तेच्या चित्रीकरणासाठी टेलिफोटो झूमच्या सामर्थ्याचा लाभ मिळतो. याशिवाय, ई-माऊंट लेन्सच्या विस्तृत रचनेशी हे सुसंगत आहे. सोनीचे ई-माऊंट लेन्स फूल फ्रेम आणि सिनेमा लाइन कॅमेरे एकाच माऊंटने कव्हर करतात.

४के१२०पी ला सुसंगत असलेला हा कॅमेरा उत्कृष्ट व्हिडीओ देतो:
जवळपास ६के एवढ्या डेटाचा वापर करून α६७०० कॅमेरा ४के १२०एफपीएसवर
उच्च फ्रेम रेटच्या चित्रीकरणासाठी अत्यंत उच्च दर्जाचे ४के व्हिडिओ प्रदान करतो. यामध्ये एस-लॉग३ वैशिष्ठ्य आहे. जे शानदार ग्रेडेशनसाठी १४+२ च्या वरील अक्षांश देते. याशिवाय, एस- सिनेटोनने सुसज्ज असलेला α६७०० कॅमेरा त्वचेच्या टोनचे चित्रण आणि सब्जेक्ट हायलाइटिंग उत्कृष्टपणे करतो. आमच्या सिनेमा लाइन डेव्हलपमेंटद्वारे नावाजले गेलेले तंत्रज्ञानदेखील यामध्ये आहे. तसेच यातील एआय चलित ऑटो फ्रेमिंग४ जी वस्तू टिपायची आहे त्याचा अगदी सहजतेने मागोवा घेते. हाताने कॅमेऱ्याची हालचाल करण्याची गरज यामुळे कमी होते आणि चित्रीकरण सोपे होते. यामध्ये ऑडिओ इंटरफेसला पूरक असा मल्टी इंटरफेस (MI) शू आहे.
लहान नेटका आकार आणि कमी वजन यामुळे एक ठिकाणाहून दुसरीकडे नेणे, हाताळणे व जोडणे हे अद्वितीयपणे होते:
अतिशय नेटका आकार (अंदाजे ४ ७/८*२३/४*३ इंच आणि जवळपास १एलबी १.४oz५ वजन) असल्याने α६७०० कॅमेरा कोठेही सोबत घेऊन जाण्यास अत्यंत सोईस्कर आहे. यामध्ये वापरकर्त्यास अनुकूल असे टच करून वापरता येण्याजोगे व्हॅरी-अॅंगल एलसीडी मॉनिटर आणि सहज काम करता यावे म्हणून आधुनिक टच मेन्यू आहे. आपल्या सोयीनुसार अनुकूल करता येण्यासारखे फ्रंट डायल आणि स्थिर फोटो व चलचित्रे मध्ये बदल करण्यासाठी स्विचिंग डायल आणि एसअँडक्यु मोड यामध्ये आहे. स्थिर फोटोसाठी ५.० स्टॉप्स६ शटर स्पीडच्या सह ऑप्टिकल ५ अॅक्सिस इन-बॉडी इमेज स्टॅबिलायझेशन प्रणालीने सुसज्ज आहे. शिवाय अॅक्टिव्ह मोड७ खात्रीपूर्वक स्थिर फूटेज देतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हा कॅमेरा आता क्लाउडवर फोटो आणि व्हिडिओ सहजपणे अपलोड करण्यासाठी क्रिएटर्स अॅप८ (Creators’ App) अॅप्लिकेशनबरोबर समर्थित आहे.

किंमत आणि उपलब्धता:
α६७०० कॅमेरा संपूर्ण भारतभर सर्व सोनी कॅमेरा लॉन्जमध्ये, सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.

मॉडेल
किंमत (रुपयांमध्ये)
उपलब्धता

ILCE-6700 (केवळ कॅमेरा)
१३६,९९०/-
२० नोव्हेंबर,२०२३ पासून

ILCE-6700L (कॅमेरा + 16–50 एमएम पॉवर झूम लेन्स)
१४७,४९०/-
२० नोव्हेंबर,२०२३ पासून

ILCE-6700M (कॅमेरा + 18–135 एमएम झूम लेन्स)
१७२,९९०/-
२० नोव्हेंबर,२०२३ पासून

१ QFHD (3840×2160). About 38% of the angle of view is cropped.
२ When shooting S-Log3. Sony internal measurement.
३ For details on the FE 70-200mm F4.0 G Macro OSS II, please see the press release announced on July 12, 2023. URL: https://pro.sony/en_PS/
४ Valid only in video mode. The angle of view is narrowed because it is cropped from a 4K resolution image.
५ Weight includes battery and memory card.
६ CIPA standard compliant, Pitch/Yaw direction, with FE 50 mm F1.2 GM attached, long exposure noise reduction off.
७ In Active Mode, the shooting angle of view is slightly narrower.
८ Check regional availability of services and applications via the URL below: Creators’ App: https://www.sony.net/cca , Creators’ Cloud: https://www.sony.net/cc/ Download app at Google Play and the App Store. Network services, content, and operating system and software subject to terms and conditions and may be changed, interrupted or discontinued at any time and may require fees, registration and credit card information.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar