फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे मागणी*_

.

दिनांक : २१.११.२०२३

 

_*फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे मागणी*_

*उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा !*
फोंडा, २१ नोव्हेंबर – उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रार करतांना शिष्टमंडळामध्ये बजरंग दलाचे श्री. रक्षीत शिरोडकर; बोरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप नाईक; फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. दिनेश शर्मा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. मिनानाथ उपाध्ये; हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक; बोरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश नाईक आणि श्री. आनंद शिरोडकर; फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. मयूर कन्नावर यांचा समावेश होता.
तक्रारीत म्हटले आहे की, हलाल प्रमाणीकरण ही समांतर प्रणाली म्हणून काम करत आहे आणि त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेविषयी संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन होत आहे. अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ८९ नुसार अन्नाचा दर्जा निश्चित करण्याचे दायित्व केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) आणि गोवा सरकारचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे आहे. केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. बहुसंख्यांक हिंदु समाज, तसेच मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना ‘हलाल प्रमाणित’ पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे त्यांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधने सर्वत्र लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत. हल्लील मडगाव रेल्वेस्थानकावर हलाल प्रमाणित वस्तूंच्या विक्रीला काहींनी विरोध केल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमात फिरत होता.

आपला विश्वासू,
*श्री. सत्यविजय नाईक*
(संपर्क क्रमांक : -९१५८९५४४५५)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar