ZEE5ने, गोव्यातील 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात प्रदर्शित केले पंकज त्रिपाठी अभिनित बहुप्रतिक्षित ‘कडक सिंग’चे ट्रेलर*

.

*ZEE5ने, गोव्यातील 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात प्रदर्शित केले पंकज त्रिपाठी अभिनित बहुप्रतिक्षित ‘कडक सिंग’चे ट्रेलर*

_अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित तसेच पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु, संजना सांघी आणि जया अहसान अभिनित ‘कडक सिंग’ 8 डिसेंबर 2023 रोजी ZEE5वर प्रदर्शित होणार_

*गोवा, नोव्हेंबर 2023:* ZEE5 ह्या भारतातील सर्वांत मोठ्या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग तसेच बहुभाषिक कथा सांगणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे, गोव्यातील प्रतिष्ठित 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात, पंकज त्रिपाठी अभिनित बहुप्रतिक्षित ‘कडक सिंग’ फिल्मचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. आशियातील सर्वाधिक मान्यताप्राप्त व प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ह्या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मान्यवर, भारतभरातील आघाडीचे तारे व जगभरातील चित्रपट रसिकांच्या उपस्थितीत, ह्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद लाभला. चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा ह्यामुळे अधिकच वाढल्या आहेत. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ‘कडक सिंग’चा वर्ल्ड प्रीमियर गोव्यात इफ्फीमध्ये ‘गाला प्रीमियर्स’ प्रवर्गात होणार आहे आणि ह्या मानाच्या प्रदर्शन सोहळ्यात सर्व कलावंत व तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा व रोमांच अधिकच वाढणार आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कडक सिंग’मध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान ह्यांच्यासह संजना सांघी प्रमुख भूमिकेत आहे. दिलिप शंकर, परेश पाहुजा, वरुन बुद्धदेव हे कलावंत ठळक सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत. विझ फिल्म्स आणि केव्हीएन प्रोडक्शन ह्यांचा ओपस कम्युनिकेशन्सशी सहयोग असून, विझ फिल्म्स (आंद्रे टिमिन्स, विराफ सरकारी आणि सब्बास जोसेफ), एचटी कॉण्टेण्ट स्टुडिओ (महेश रामनाथन) आणि केव्हीएनने ‘कडक सिंग’ची निर्मिती केली असून, श्याम सुंदर व इंद्रानी मुखर्जी सहनिर्माते आहेत.
ह्या चित्रपटात ए. के. श्रीवास्तव उर्फ कडक सिंग ह्यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे सहसंचालक असलेले एके सध्या मागे जाणाऱ्या (रेट्रोग्रेड) अॅम्निशियाशी झगडत आहेत. एके रुग्णालयात दाखल झाले असताना चित्रपटाची कथा उलगडत जाते. त्यांच्या भूतकाळाच्या विसंगती स्पष्ट करणाऱ्या घटना ह्यात दाखवल्या जातात. ह्या घटनांमुळे एकेंना कल्पनेहून सत्य वेगळे करणे भाग पडते. अर्धकच्च्या आठवणींच्या चक्रव्यूहात उसलेले असतानाच, त्यांना रहस्यमयरित्या रुग्णालयात आणले गेल्यामागील सत्य उलगडण्याचा निर्धार ते करतात. त्याचप्रमाणे एका आर्थिक गुन्ह्याचा पाठलागही करतात आणि आपले मोडकळीला आलेले कुटुंबही धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ही कथा एका बिनसलेल्या कुटुंबाचीही आहे. आकस्मिक घटनांच्या मालिकेमुळे भावनांच्या चढउतारांतून वाट काढताना कुटुंबीय एकमेकांजवळ कसे येतात हेही ह्यात आहे. वेगवेगळ्या स्वरूपांतील नातेसंबंधांवर आणि हे नातेसंबंध वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून कथा कशी पुढे घेऊन जातात ह्यावर ह्या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले, “कडक सिंगसारखी व्यक्तिरेखा मी ह्यापूर्वी कधीच केलेली नाही. ही एक वेगळीच व्यक्तिरेखा आहे आणि अशी बहुपदरी व्यक्तिरेखा निभावणे खूपच आनंददायी होते. शिवाय मला टोनी दा, पार्वती, जया आणि संजनासारखी तरुण व उत्साही अभिनेत्री अशा अविश्वसनीय प्रतिभावंतांसह काम करण्याची संधी मिळाली. सर्वांची ऊर्जा व कामाबद्दलची कळकळ ह्यांमुळे ही फिल्म कागदावरून पडद्यावर जिवंत झाली आहे. फिल्मचे ट्रेलर काल रात्री इफ्फीमध्ये प्रदर्शित झाले. हा अनुभवही रोमांचक होता. आम्हाला प्रेक्षकांनी ट्रेलरला दिलेला प्रतिसाद प्रत्यक्ष बघणे शक्य झाले. आम्ही इफ्फीमध्ये फिल्मचे स्क्रीनिंगही करणार आहोत. त्यामुळे फिल्मला कसा प्रतिसाद मिळतो ह्याकडेही आमचे लक्ष लागले आहे.”

अभिनेत्री पार्वती म्हणाल्या, “चित्रपट करण्याच्या प्रत्येक अंगाचा अनुभव 10 पैकी 10 असा अव्वल ठरणे तसे दुर्मीळच आहे. हा दुर्मीळ अनुभव मला ‘कडक सिंग’ने मिळवून दिला. टोनी दांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिरेखा रंगवण्याची संधी मिळण्यापासून ते दस्तुरखुद्द पंकजजींसोबत काम करणे, संजना सांघी, परेश पाहुजा आणि जया अहसान ह्यांचा अफलातून अभिनय जवळून बघणे, प्रत्येक विभागातील तंत्रज्ञांचे परिपूर्ण सहाय्य सेटवर मिळत राहणे, सातत्याने आमचा उत्साह वाढवत राहणाऱ्या विराफ सरकारींच्या नेतृत्वाखालील काळजी घेणाऱ्या निर्मिती टीमचा अनुभव घेण्यापर्यंत सर्व काही जादूई होते. आपण ज्या काळात राहत आहोत, त्या काळात माणुसकीशी संपर्क कायम राहावा म्हणून उत्तम कथा सांगितल्या जाणे आपली गरज आहे. टोनी दा आणि टीमने ‘कडक सिंग’च्या माध्यमातून आपल्यासाठी हा अनुभव निर्माण केला आहे.”

अभिनेत्री संजना सांघी म्हणाली, “रितेश शहा ह्यांनी अगदी पहिल्यांदा ‘कडक सिंग’ची कथा सांगितल्यापासून आपण काहीतरी खास करणार आहोत अशी जाणीव मला आतून होत होती. ही सुंदर कथा टोनी दा (अनिरुद्ध रॉय चौधरी) आणि विझ फिल्म्समधील टीम ह्यांनी तेवढ्याच सौंदर्यासह जिवंत केली आहे. साक्षी ही अनेक पदर असलेली आणि जटील व्यक्तिरेखा माझे प्रेरणास्थान असलेल्या पंकज त्रिपाठी ह्यांच्यासह जिवंत करण्यासाठी माझ्यावर विश्वास टाकला गेला होता. ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. ते उस्ताद आहेत, अभिनयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. इफ्फी गोवादरम्यान ट्रेलर प्रेक्षकांपुढे आणण्याहून तसेच त्यापाठोपाठ फिल्मचा वर्ल्ड प्रीमियर केला जाण्याहून अधिक चांगल्या मार्गाची कल्पना मी करूच शकत नाही.”
अभिनेत्री जया म्हणाली, “ही फिल्म आणि मी ह्यात अभिनेत्री म्हणून निभावत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे माझ्यासाठी अगदी नवीन, ताजातवाना व नक्कीच समृद्ध करणारा अनुभव होता. संपूर्ण टीम आणि मला सोबत काम करण्याची संधी मिळालेली कलावंतांची फौज, विशेषत: पंकजजी, अविश्वसनीय होती. एक दिग्दर्शक म्हणून अनिरुद्ध रॉय चौधरींसोबत काम करण्याची इच्छा मला नेहमीच होती. मला त्यांच्यासोबत काम करायचे होते आणि एका नवीन इंडस्ट्रीत, वेगळ्या भाषेत पाऊल टाकायचे होते. हा अनुभव माझ्यासाठी खूपच रोमांचक व तेवढाच आव्हानात्मक होता. कथानक खूपच खिळवून ठेवणारे, बुडवून टाकणारे होते. मी ह्यापूर्वी असे काम कधीच केले नव्हते. मी आजवर केलेल्या कामामध्ये ह्या कामाला खास स्थान आहे, असे मला वाटते. शंतनू मोइत्रा ह्यांचे संगीत खूपच सुंदर आहे, ते नेहमीच फिल्म्समध्ये अशाच सुंदर रचना व गाणी करतात! हे संगीत त्या क्षणाची आणि सर्वांच्या कामाची खुमारी वाढवते. अविक मुखोपाध्याय ह्यांच्या सेटवरील प्रकाशयोजनेमुळे सर्व काही अत्यंत सुंदर आणि वास्तवही भासते. मला ह्या टीमसोबत काम करताना खूप आनंद मिळाला आणि कधी एकदा फिल्म प्रदर्शित होते असे मला झाले आहे.”

‘कडक सिंग’ 8 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शनासाठी सज्ज, केवळ ZEE5वरून!

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar