चित्रपटाच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे; कथा सादरीकरणात चांगल्यासाठी आयुष्य बदलण्याची शक्ती आहे: ब्रिलिआंट मेंडोझास्वतंत्र चित्रपट- दिग्दर्शक

.

चित्रपटाच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे; कथा सादरीकरणात चांगल्यासाठी आयुष्य बदलण्याची शक्ती आहे: ब्रिलिआंट मेंडोझास्वतंत्र चित्रपट- दिग्दर्शक आणि फिलीपाईन्समधील नव्या लाटेतील सिनेमाच्या ज्वलंत प्रवर्तकांपैकी एक असलेले ब्रिलिआंट मेंडोझा यांनी आपल्या चित्रपट निर्मितीच्या अनोख्या प्रक्रियेद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली. गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान मेंडोझा पहिल्या मास्टरक्लासमध्ये सहभागी झाले होते.मास्टरक्लासची सुरुवात मेंडोझाच्या बहु – प्रशंसित मा’रोसा चित्रपटाच्या पडद्यामागील दृश्यांमध्ये डोकावून झाली. मेंडोझा यांनी स्पष्ट केले की ठोस पटकथेपेक्षा कथेतून  चित्रपट पुढे नेण्याला त्यांचे  प्राधान्य असते. व्यक्तिरेखा विकासाच्या अत्यंत अभिनव आणि सखोल प्रक्रियेबद्दल ते म्हणाले की, ते त्यांच्या कलाकारांना पटकथा किंवा लिहिलेले संवाद देत नाहीत  तर ते त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या नैसर्गिक स्थितीत ठेवतात. त्यांचे दिग्दर्शन कौशल्य मजबूत परस्पर विश्वासावर आधारित असते ज्यात ते कलाकारांच्या नैसर्गिक उपजत अभिनयाला वाव देतात.आपल्या प्रॉडक्शन डिझाईनबद्दल बोलताना मेंडोझा म्हणाले की त्यांच्या निर्मितीतील प्रत्येक बारीक तपशील कथा सांगण्यासाठी एकत्र येतो. ते त्यांच्या व्यक्तिरेखांसाठी  पूर्णपणे प्रामाणिक राहण्यासाठी कोणतेही कृत्रिम सेट वापरत नाहीत  तर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चित्रीकरण करतात.त्यांच्या चित्रपटांमधील आवाज हे देखील एक व्यक्तिरेखा असते  असे त्यांनी सांगितले. ते कधीही काढून टाकले जात नाहीत आणि प्रेक्षकांना  कथेचे वातावरण ऐकण्यास आणि अनुभवण्यास मदत करते. संकलन  प्रक्रियेबद्दल बोलताना मेंडोझा म्हणाले की,त्यांच्या  तीन-टप्प्यातील चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे ज्याची सुरुवात कल्पना आणि तयारीने होते आणि नंतर चित्रीकरण आणि निर्मिती पर्यंत प्रवास असतो. संकलकाच्या टेबलमध्ये चित्रपट एकत्र गुंफला जातो असे त्यांनी स्पष्ट केले.एक चित्रपट निर्माता म्हणून स्वत: बद्दल बोलताना, मेंडोझा यांनी सांगितले की मी पंचेचाळीस वर्षांचा होईपर्यंत चित्रपट निर्मितीला सुरुवात केली नव्हती. जाहिरात क्षेत्रातील त्यांची प्रदीर्घ पार्श्वभूमी विक्री आणि उत्पादन वाढीभोवती केंद्रित होती , त्यामुळे त्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये संपूर्ण उलट प्रयोग  करण्याची इच्छा होती.आपल्याकडे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नाही आणि ते केवळ आपल्या  अनुभवाचा उपयोग स्वतःला मार्गदर्शन करण्यासाठी करतात असे त्यांनी नमूद केले त्यांच्या आयुष्याला वळण देणारा टप्पा तेव्हा आला जेव्हा त्यांचा पहिला चित्रपट द मॅसर प्रेक्षकांना भावला. हा चित्रपट त्यांच्या देशाची सत्यकथा असल्याचे त्यांनी सामायिक केले  जेव्हा ते त्यांच्या मुळांशी गेले. त्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली.
आपण  लोकांसाठी चित्रपट बनवतो आणि हे चित्रपट कसे आहेत ते ठरवण्याचे काम त्यांच्यावर सोपवतो असे त्यांनी सामायिक केले.  भारतीय प्रेक्षकांबद्दल बोलताना, त्यांनी नमूद केले की ते जे सांगण्याचा प्रयत्न करतात त्या कथांशी ते एकरूप होतात.  “जर एखाद्या व्यक्तीला एखादा चित्रपट भावला तर तो त्याच्या जीवनाचा भाग बनतो, ही कथा सादरीकरणाची  ताकद आहे,” असे मेंडोझा म्हणाले.नवोदित दिग्दर्शकांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही स्वतःमध्ये चित्रपट निर्माते म्हणून शोध घ्यायला हवा आणि तुमच्या कलेशी प्रामाणिक रहायला हवे.  “हे सोपे असणार  नाही. चित्रपट निर्मिती ही केवळ आवड नाही तर सत्य कथा सांगण्याप्रति एक वचनबद्धता आहे,” असे त्यांनी नमूद केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar