मुंबई-3’ चित्रपटात १४ वर्षांच्या एम्स राठोडची भेदक अदाकारी

.

‘मुंबई-3’ चित्रपटात १४ वर्षांच्या एम्स राठोडची भेदक अदाकारी

भारत बेतकेकर यांजकडून

पोस्टर रिलीज होताच रसिकांनी घेतले डोक्यावर, चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक , कलाकारांची इफ्फी महोत्सवाला उपस्थिती

म्हापसा (प्रतिनिधी)
“ये कटवे जिस सर जमीन पे तू खडा है ना उसे हिंदुस्थान कहते हैं! हिंदुस्थान का मतलब हिंदुओंका स्थान जय श्री राम!” ह्या आपल्या डायलॉगबाजीने रसिकांच्या मनावर अधिराज करणाऱया आणि मुख्य नायकाच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षीय एम्स राठोड या मुलावर संपूर्णपणे बेतलेल्या ‘मुंबई-3’ या चित्रपटात एम्सने आपल्या अभिनायाची छाप सोडली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने गोव्यात आलेले ‘मुंबई-3’ या चित्रपटाचे निर्माते शाहबाज राठोड, दिग्दर्शक प्रिया राठोड, मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेतील 14 वर्षीय एम्स राठोड, अभिनेत्री रिद्धिमा गुफ्ता, कलाकार तसेच सहनिर्माता राम मेहरा आदींनी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. ‘मुंबई-3’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून, या चित्रपटाच्या कथानकाबाबत रसिकांना आत्तापासूनच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
हरीश पटेल यांनी यशस्वीरित्या या चित्रपटाचे लेखन करून हिंदू मुले मुस्लिम गुंडांच्या चक्रव्युहात कशा पद्धतीने अडकतात आणि त्यांचे करिअर कसे उध्वस्त होते, यावर ‘मुंबई-3’ या चित्रपटाचे कथानक फिरते.
मुंबईतील एक वस्ती संपूर्णत बदनाम असून, यामध्ये अंडरवर्ल्ड अड्डा असलेल्या एका बदनाम वस्तीत मध्यमवर्गीय कुटुंब राहत आहे. एका बदनाम आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी राजकारणीही घाबरत असलेल्या वस्तीत राहूनही शम्सवर चांगले संस्कार हे मध्यमवर्गीय कुटुंब करते. 14 वर्षांचा एम्स क्रिकेटमधील करिअरसाठी जी धडपड करतो, त्याला या गुंडाचा अडथळा निर्माण होतो आणि यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांनी घेतलेली धडपड आणि टक्कर या चित्रपटाच्या कथानकाला मोठे करून जाते. क्रिकेटमधील करिअरसाठी धडपडणाऱया एम्सला बदनाम वस्तीतील म्हणून हिणवले जाते, यावर मुलाच्या करिअर जो परिणाम होतो, त्यातून त्याला बाहेर काढण्याचे काम त्याचे पालक करतात.
1990 मध्ये मुंबईवर अंडरवर्ल्डचे राज होते. यामध्ये राजकारणीही बळी पडले होते. अंडरवर्ल्डमधील गुंडांच्या संबंधांवर हा चित्रपट बेतलेला असल्याने 14 वर्षीय मुख्य कलाकार असलेल्या एम्सने आणि त्याच्या कुटुंबियांनी चित्रपटात गुंडांनी दिलेली टक्कर हे सर्व कथानकात घटना आणि प्रसंगानुरुप घेतल्याने या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध होताच त्याची चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे.

कोट करा…
शम्स राठोड या कलाकाराचा यापूर्वीच ‘ओटीटी’वर ‘हम है गली राज बॉईज ऍण्ड गर्ल्स’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गोव्यातही अशा पद्धतीचा शो करण्यासाठी आम्ही इच्छूक आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिरवा कंदील दाखवल्यास आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे.
– प्रिया राठोड, दिग्दर्शक

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar