चित्रपटसृष्टीत आता महिलांचा काळ अवतरतोय”: लॅटव्हियन चित्रपट ‘फ्रेजाइल ब्लड’ च्या दिग्दर्शक उना सेल्मा

.

चित्रपटसृष्टीत आता महिलांचा काळ अवतरतोय”: लॅटव्हियन चित्रपट ‘फ्रेजाइल ब्लड’ च्या दिग्दर्शक उना सेल्मा

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फ्रेजाइल ब्लड’ या लॅटव्हियन चित्रपटाच्या दिग्दर्शिका उना सेल्मा यांनी सांगितले की, चित्रपटांमध्ये आता महिलांची वेळ येत आहे.

“कामाच्या ठिकाणी आणि क्लबमध्ये घरगुती हिंसाचाराबद्दल असंख्य स्त्रियांकडून मी ऐकत आले आहे. आणि त्यामुळेच मला चित्रपट करण्याचा विचार आला.” असे या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले. हा चित्रपट शारीरिक हिंसाचाराच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना होणाऱ्या मानसिक आणि लैंगिक हिंसाचारावर प्रकाश टाकतो, असे उना सेल्मा यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी “कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था असूनही, घरगुती हिंसाचार कायम आहे” याबद्दल खंत व्यक्त केली

उना सेल्मा यांनी त्यांच्या देशातील चित्रपट सृष्टीत महिलांचा वाढता ओघ अधोरेखित केला. काळ बदलत आहे आणि पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत चित्रपटसृष्टीत येणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.”, असे त्यांनी नमूद केले.

जिथे सामाजिक नियमांचे पालन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, जिथे वास्तव हे ‘मिथक’ आहे अशा समाजात नायिका डायना राहात असते. इगोरसोबत सह-निर्भर वैवाहिक जीवनात अडकल्यामुळे, तिला तिच्या मुलीला, अस्त्राला दुखावण्याचा धोका आहे. अशी वेळ येते की तिला मुलगी किंवा पती हे निवडण्याची वेळ येते. भ्रम वास्तवात उतरत असताना, डायनाला ठरवायचे आहे की, आता अजून काही उशीर झालेला नाही. हे द्वंद्व या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

चित्रपटाचा सारांश:

कलाकार आणि पडद्यामागील कलाकार :

दिग्दर्शक: उना सेल्मा

निर्माते: डेस सियाटकोव्स्का, उना सेल्मा

पटकथा: उना सेल्मा

कलाकार: इल्झे कुझुले, एगॉन्स डोम्ब्रोव्स्कीस, अँडा रेइन

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar