गेमप्ले’चा अनुभव वाढवण्यासाठी ‘सोनी इंडिया’तर्फे ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस गेमिंग हेडसेट’ सादर; ‘फॅनेटिक’चे मिळाले सहकार्य

.

‘गेमप्ले’चा अनुभव वाढवण्यासाठी ‘सोनी इंडिया’तर्फे ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस गेमिंग हेडसेट’ सादर; ‘फॅनेटिक’चे मिळाले सहकार्य
नवी दिल्ली, २8 नोव्हेंबर २०२३ : ‘सोनी इंडिया’ने ‘इनझोन एच-फाइव्ह’ हे नवे वायरलेस हेडसेट सादर केले आहेत. २८ तासांचा अखंडित गेमप्ले यातून मिळू शकतो आणि त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या पीसी गेम्स वापरकर्त्यांना आरामात खेळता येतात. ‘फॅनेटिक’ या प्रसिद्ध इस्पोर्ट्स टीमच्या सहकार्याने ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस हेडसेट’ विकसीत करण्यात आले आहेत.
अचूक-अभियांत्रिकीतून निर्माण होणारा ३६० अंश कोनांतून उमटणारा अवकाशीय आवाज हे या हेडसेटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस गेमिंग हेडसेट’मधून ‘थ्री-डी साउंड पोझिशनिंग’चा आनंद मिळतो. यातील ‘इमर्सिव्ह ऑडिओ रिअ‍ॅलिझम’ आणि ‘पिनपॉईंट साउंड अॅक्युरसी’चा मोठाच फायदा गेममध्ये एक पाऊल पुढे राहण्यासाठी वापरकर्त्यांना मिळतो.
या हेडसेटचे वजन केवळ २६० ग्रॅम असून ‘सॉफ्ट-फिट इअर पॅड’ व ‘लो-प्रेशर डिझाईन’ यांमुळे ‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ हा दीर्घकाळ चालणाऱ्या गेमिंग सत्रांमध्येही आरामदायी ठरतो. अतिशय कमी वजन, आरामदायीपणा आणि टिकाऊपणा यांचे परिपूर्ण संयोजन असल्याने ‘पीसी गेमप्ले’साठी हा हेडसेट अगदी आदर्श आहे.
पार्श्वभूमीतील अनावश्यक आवाज व खरखर कमी करण्यासाठी यामध्ये एआय-आधारित यंत्रणा वापरण्यात आली आहे. यातील ‘बाय-डायरेक्शनल मायक्रोफोन’मुळे स्पष्ट आवाजात संभाषणाचा आनंद घेता येतो. ‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ तुमच्या आवाजाला प्राधान्य देतो. त्यामुळे इन-गेम कॉल्स अत्यंत स्पष्टतेने ऐकायला येतात व तुम्हाला गेममधील रणनीती प्रभावीपणे बनवता येते.
‘इनझोन एच-फाइव्ह’च्या वायरलेस क्षमतेमुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय गेम खेळता येते व गेममधील एकही महत्त्वाचा क्षण चुकत नाही. यामध्ये यूएसबी डोंगलसह लो-लेटेंसी २.४ गिगाहर्ट्झ वायरलेस कनेक्शन दिल्यामुळे तुम्हाला २८ तासांपर्यंत केबलशिवाय मुक्तपणे गेम प्ले करता येतात.
अधिक उच्च पातळीचा आणि तितकाच खालच्या पातळीवरचा आवाज वितरीत करण्यासाठी, एक डायनॅमिक ऑडिओ अनुभव प्रदान करण्यासाठी ‘इनझोन एच-फाइव्ह’ हा हेडसेट तयार

केला गेला आहे. तो तुम्हाला गेममध्ये मग्न करतो. अगदी पावलांच्या हळुवार चाहुलीपासून ते स्फोटासारख्या महाभयंकर आवाजापर्यंतचा प्रत्येक ध्वनी या हेडसेटमधून जिवंत होतो.
‘इनझोन एच-फाइव्ह’च्या माध्यमातून वापरकर्त्यांना आपला गेमिंगचा अनुभव संपूर्णपणे सानुकूलित करता येतो. ऑडिओ आणि माइकमधील प्राधान्ये तयार करण्यासाठी या हेडसेटमध्ये अचूक नियंत्रणाची सेटिंग्ज आहेत. याकरीता तुमच्याकडे तुमच्या गेमच्या स्टाईलसाठी योग्य तो सेटअप असणे आवश्यक आहे. ‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ हे तुमच्या गेमिंगच्या उत्कृष्ट अनुभवाचे तिकीट आहे. यातील प्रगत वैशिष्‍ट्ये, अचूक ऑडिओ आणि आरामदायीपणा यांमुळे तुम्‍ही तुमच्‍या आवडत्‍या गेममध्‍ये मग्न होऊ शकता आणि आपल्याकडे अत्युत्कृष्ट उपकरण आहे याची जाणीव होत राहून तुम्ही मोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळू शकता.
किंमत आणि उपलब्धता
‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ येत्या दि. ३० नोव्हेंबरपासून भारतातील सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर व सोनी एक्स्क्लुझिव्ह), www.ShopatSC.com हे पोर्टल, इतर प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्स येथे उपलब्ध असेल.
मॉडेल
सर्वोत्तम किंमत (रुपयांमध्ये)
उपलब्धतेची तारीख
उपलब्ध रंग

इनझोन एच-फाइव्ह
१५,९९०/-
३० नोव्हेंबर २०२३पासून पुढे
काळा व पांढरा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें